Kumar Sangkara Health Update: टीम इंडिया आणि श्रीलंकेत (India vs sri lanka)तीन सामन्यांची टी20 मालिका सूरू आहे. या मालिकेतील तिसरा टी20 सामना आज सायंकाळी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (saurashtra cricket association stadium)खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा (Kumar Sangkara)याच्यावर पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहेत. त्यामुळे तो आता ठणठणीत बरा झाला आहे. दरम्यान अनेक क्रिकेट फॅन्सना प्रश्न पडलाय. नेमकं संगकाराला झालं तरी काय होते? हेच या बातमीतून जाणून घेऊयात.
टीम इंडिया आणि श्रीलंका याच्यातील टी20 मालिकेदरम्यान अचानक माजी क्रिकेटपटू कुमार चोक्शानंद संगकारा (Kumar Sangkara) यांची प्रकृती ढासळली होती. संगकारा यांचे अंग थरथर कापत होतं आणि शरीर तापाने फणफणलं होतं. त्यामुळे त्यांना हिंजवडी मधील रुबी हॉल क्लिनीकमध्ये (Rubi hall clinic) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहे.या उपचारानंतर ते ठणठणीत बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला आहे.
कुमार संगकारा (Kumar Sangkara) हे टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याचे समालोचन करण्यासाठी भारतात आले होते. मात्र या मालिकेदरम्यानच त्यांची प्रकृती ढासळली होती. कुमार संगकारा यांना संध्याकाळी ८ वाजता पुणे हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते. या रूग्णालयात त्यांच्यावर डिहायड्रेशन आणि उच्च तापावर उपचार करण्यात आले. त्यांना काल सामन्यापूर्वी डिस्चार्ज देण्यात असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीधर देशमुख यांनी दिली आहे.
घरीच डॉक्टरांना बोलावण्यात आले होते, जिथे त्यांना थंडी वाजून येणे, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह आणि उच्च ताप आला असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये ते डिहायड्रेट झाल्याचे आढळून आले होते आणि 103 डिग्री सेल्सिअस ताप होता. आम्ही त्यांना दवाखान्यात दाखल करून घेतले आणि त्यांना पुन्हा हायड्रेट केले आणि इतर सहाय्यक उपचार दिले गेले. आणि ते विषाणूजन्य डिहायड्रेशन आजारातून लवकर बरे झाले, असे डॉ. श्रीधर देशमुख यांनी सांगितले.
मी डॉ श्रीधर देशमुख आणि त्यांच्या टीमचे आभार मानू इच्छितो जे अत्यंत सक्षम आणि अविश्वसनीय होते. प्रत्येक पैलूकडे लक्ष दिले गेले आणि मी चांगल्या हातात आहे हे जाणून मला सुरक्षित वाटले. मी रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वांच्या अविस्मरणीय आठवणी घेऊन जात आहे आणि माझी प्रकृती पूर्ववत सुधारल्या बद्दल मी त्यांचा खूप आभारी असल्याचे कुमार संगकारा म्हणालाय.
दरम्यान आता तो या आजारपणातून बरा झाल्यानंतर तो लवकरच टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs sri lanka) यांच्यातील सामन्यात समालोचन करताना दिसणार आहे.