Kuldeep Yadav Viral Video : दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. सामन्यामध्ये भारताने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॉलर्सने चमकदार कामगिरीही केली, कुलदीपने घेतलेल्या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने माक्रमला पहिल्याच चेंडूवर बाद केलं. (ind vs sa Kuldeep Yadavs dangerous spin Batsman Aiden Markram out Video Viral)
कुलदीपने 16 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर माक्रमला बोल्ड केलं. माक्रमला आपल्या फीरकीच्या जाळ्यामध्ये कुलदीपने अडकवलं. माक्रम बचावासाठी खेळायला गेला मात्र चेंडू असा काही स्पिन झाला की पॅड आणि बॅटच्या मधून जाऊन थेट स्टम्पवर आदळला.
या खतरनाक स्पिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना शेन वॉर्नची आठवण झाली आहे. 2019 च्या वर्ल्डकपमध्येही कुलदीपने मँचेस्टरमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही अशाच एका मॅजिक बॉलने बाद केलं होतं.
What a ball by Kuldeep Yadav to get Makram on duck, similar to the 2019 World Cup ball against Babar Azam. pic.twitter.com/4eO26iZjyW
— Cricket is Love (@cricketfan__) October 6, 2022
Kuldeep yadav special magic delivery. The Perfect ball. Absolutely beauty.#IndvsSAodi pic.twitter.com/dwYp0yyqQZ
— Rohit.Bishnoi (@The_kafir_boy_2) October 6, 2022
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा 9 धावांनी पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 250 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 240 धावा करता आल्या. भारताकडून संजू सॅमसनने नाबाद 86 धावांची खेळी केली. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्याने भारतीय संघाचा पराभव झाला आहे.