IND vs AUS:टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा बादशाह, जाणून घ्या

IND vs AUS Head to Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिली कसोटी मालिका (IND vs AUS) 75 वर्षांपूर्वी खेळली गेली होती. परंतु 26 वर्षांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत कसोटी मालिका सुरू झाली होती.

Updated: Feb 4, 2023, 07:41 PM IST
 IND vs AUS:टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा बादशाह, जाणून घ्या title=

India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया  (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा निकाल लागणार आहे.त्यामुळे दोन्ही संघ मैदानात कसून सराव करतंय. गेल्या साधारण 26 वर्षापुर्वी पासून या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नेमकी ही स्पर्धा कोणी? आणि किती वेळा जिंकलीय? हे जाणून घेऊयात. 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा इतिहास काय?

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिली कसोटी मालिका (IND vs AUS) 75 वर्षांपूर्वी खेळली गेली होती. परंतु 26 वर्षांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत कसोटी मालिका सुरू झाली होती.ऑक्टोबर 1996 रोजी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेला बॉर्डर-गावस्कर करंडक असे नाव देण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) अंतर्गत कसोटी सामने आयोजित केले जातात.

 

हे ही वाचा : मुंबईच्या Kieron Pollardची बॅट तळपली! एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 'इतक्या' धावा

 

टीम इंडियाचं वर्चस्व

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) ऑक्टोबर 1996 मध्ये पहिल्यांदा खेळवली गेली होती.ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आणि येथे त्यांना 7 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता.अशाप्रकारे पहिली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताच्या नावावर झाली होती. तेव्हा फक्त एकच कसोटी सामना खेळवला गेला होता. त्यानंतर आतापर्यंत या ट्रॉफीवर फक्त भारताचचं वर्चस्व राहीलं आहे.

गेल्या 26 वर्षात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy)15 वेळा आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारताने 9 वेळा जिंकली आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने केवळ 5 वेळा जिंकली आहे. तर एकदा ही ट्रॉफी अनिर्णित राहिली होती.या कालावधीत एकूण 52 सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताने 22, तर ऑस्ट्रेलियाने 19 सामने जिंकले. तर दोन्ही संघांमध्ये 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. विशेष बाब म्हणजे या काळात ऑस्ट्रेलियन संघाला भारतात फक्त एकदाच ट्रॉफी जिंकता आली आहे.

'या' स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात नोव्हेंबर 1947 ते जानेवारी 1992 या बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar Trophy) ट्रॉफीपूर्वीच्या काळात म्हणजेच सुमारे 45 वर्षांमध्ये 12 कसोटी मालिका खेळल्या गेल्या होत्या. या 12 पैकी 7 मालिका ऑस्ट्रेलियाच्या नावावर होत्या, तर भारतीय संघ फक्त एकदाच मालिका जिंकू शकला.तर 4 वेळा मालिका अनिर्णित राहिली. म्हणजेच ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व कायम राहिले. या कालावधीत झालेल्या एकूण 50 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने 24 सामने जिंकले आणि भारताला फक्त 8 विजय मिळाले. या दरम्यान 17 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत राहिला होता.

दरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची (Border-Gavaskar Trophy)आकडेवारी पाहता भारताचे आकडे खुपच चांगले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे आकडे काहिसे खास नाही आहेत. मात्र आता या स्पर्धेत हे आकडे सुधारण्याची ऑस्ट्रेलियाला संधी आहे, तर टीम इंडियाला विजयरथ कायम राखण्याची संधी आहे.