13.25 कोटींच्या Harry Brook ची टी-20 लीगमधून अखेर माघार; वाचा नेमकं कारण काय?

ब्रूकने नुकतंच या लीगमधून त्याचं नाव काढून घेतलं होतं. त्यानंतर आता त्याने अजून एका डोमेस्टिक लीगमधून माघार घेतली आहे.

Updated: Jan 25, 2023, 07:31 PM IST
13.25 कोटींच्या Harry Brook ची टी-20 लीगमधून अखेर माघार; वाचा नेमकं कारण काय? title=

Harry Brook to miss PSL 2023 : इंग्लंड क्रिकेट टीमचा (England Cricket Team) धडाकेबाज खेळाडू हॅरी ब्रूक (Harry Brook) याला आयपीएल 2023 (IPL 2023) च्या मिनी ऑक्शनमध्ये 13.25 कोटी रूपयांना सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) खरेदी केली. यानंतर हॅरी ब्रूकच्या नावाची एकच चर्चा सुरु झाली. यानंतर हॅरी एका चांगल्या लयीत देखील दिसून येत होता. मात्र अशातच त्याने लीगमधूम नाव मागे घेतल्याची माहिती मिळतेय.

आयपीएलचं यश पाहून इतर देशांनी देखील त्यांची डोमेस्टिक लीग सुरू केली आहे. ज्यामध्ये मोठं उदाहरण म्हणजे सध्या दक्षिण आफ्रिकेच खेळवली जाणारी T20 लीग. ब्रूकने नुकतंच या लीगमधून त्याचं नाव काढून घेतलं होतं. त्यानंतर आता त्याने अजून एका डोमेस्टिक लीगमधून माघार घेतली आहे.

पीएसीएलमधून Harry Brook ची माघार

पीएसएल म्हणजेच पाकिस्तान सुपर लीग येत्या 13 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ज्याची तयारी देखील जोरदार सुरु आहे. मात्र त्याचपूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार खेळाडू Harry Brook ने पाकिस्तान सुपर लीगमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. पीएसीएलमध्ये तो लाहौर कलंदर टीमचं प्रतिनिधित्व करत होता. गेल्या सिझनमध्य त्याने 264 रन्स करत टीमच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं.

कोण आहे हॅरी ब्रूक?

23 वर्षीय इंग्लंडच्या फलंदाज हॅरी ब्रूक्सला सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) तब्बल 13 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले आहे. हॅरी ब्रूक्सला आपल्याकडे घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (Rajastan Royals) यांच्यात रस्सीखेच सुरू होती. बघता बघता बोली 10 कोटींवर गेली. अखेर हैदराबादने ब्रूक्सवर 13.25 कोटींची बोली लावली आणि राजस्थान रॉयल्सला माघार घ्यावी लागली.

दरम्यान, आत्तापर्यंत 20 टी-ट्वेंटी सामने खेळणाऱ्या 372 धावा केल्या आहेत. 137 च्या स्टाईक रेटने बोक्सने धावा चोपल्या आहेत. तर यात त्याने 30 चौकार तर 15 गगनचुंबी षटकार खेचले आहेत. तर आत्तापर्यंत 4 टेस्टमध्ये 3 शतक देखील झळकावली आहेत. त्यामुळे त्याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली होती.