क्रिकेटर कर्ण शर्माच्या घरी तोडफोड आणि फायरिंग

टीम इंडियाचा खेळाडू कर्ण शर्मा याच्या घरावर बुधवारी रात्री तोडफोड झाल्याची आणि फायरिंग झाल्याची माहिती आहे. मेरठ येथे राहणा-या कर्ण शर्माच्या घरी बरीच तोडफोड करण्यात आली आहे.

Updated: Oct 13, 2017, 01:11 PM IST
क्रिकेटर कर्ण शर्माच्या घरी तोडफोड आणि फायरिंग title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा खेळाडू कर्ण शर्मा याच्या घरावर बुधवारी रात्री तोडफोड झाल्याची आणि फायरिंग झाल्याची माहिती आहे. मेरठ येथे राहणा-या कर्ण शर्माच्या घरी बरीच तोडफोड करण्यात आली आहे.

तसेच त्यांना भीती दाखवण्यासाठी फायरिंगही करण्यात आली. याप्रकरणी कर्णच्या वडीलांनी कंकरखेडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी शेजारी ठेकेदार राहुल गुप्ता आणि त्याच्या साथीदारांवर तोडफोडीचा आरोप लावला आहे. 

पोलिसींना आरोपीला ताब्यात घेतल असून दोन्ही पक्षांकडून प्रकरण मिटवण्याची चर्चा सुरू आहे. क्रिकेटर कर्ण शर्मा कंकरखेडा पोलीस स्टेशन परिसरात यूरोपियन स्टेट कॉलनीमध्ये परिवारासोबत राहतो. त्याच्या घराशेजारी राहुल गुप्ता याचं घर आहे. तो ठेकेदारीचं काम करतो. दोघांच्याही घराची एकच भींत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णच्या कुटुंबियांनी या भींतीवर मडके ठेवले होते. त्यामुळे हा वाद झाला. 

ही घटना घडली तेव्हा कर्ण घरी नव्हता. त्याचे वडील म्हणाले की, सध्य तो विशाखापट्टनममध्ये सामना खेळण्यासाठी गेला आहे. राहुल बुधवारी रात्री साथीदारांसोबत घरात घुसला आणि सर्व मडके तोडले. आम्हाला घाबरवण्यासाठी त्यांनी फायरिंगही केली. 

दरम्यान, कर्ण शर्मा हा बॉलर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करिअरची सुरूवात २०१४ मध्ये केली होती. तेच वनडे सामन्यातील करिअरची सुरूवात त्याने २०१४-१५ मह्द्ये श्रीलंके विरूद्ध केली होती.