मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सीची खोली चोरांनी साफ केलं. मेस्सी त्याचा क्लब PSGसाठी चॅम्पियन्स लीग सामन्यातून परत येताच अंदाज लावला की, चोरांनी त्याच्या हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला आणि त्याच्या खोलीत ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम लुटली. ही घटना त्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये खोलीत घडली जिथे तो त्याची पत्नी आणि 3 मुलांसोबत पॅरिसमध्ये राहतो.
द सन मधील एका वृत्तानुसार, दागिने हजारो पौंड किमतीचे होते आणि चोरांची टोळी हॉटेलच्या छतावरून मेसीच्या खोलीत घुसली. मेस्सी सध्या पॅरिसमधील एका आलिशान हॉटेलमध्ये थांबला आहे.
एका अहवालानुसार, तो हॉटेलमधील 4 खोल्यांच्या रॉयल सुइटसाठी प्रति रात्र सुमारे $ 23,000 (सुमारे 17 लाख) मोजतो आहे.
अहवालानुसार, मेस्सी ऑगस्टमध्ये बार्सिलोनामधून PSG मध्ये सामील झाला आणि अद्याप पॅरिसमधील त्याच्या घरी गेला नाही. त्याच्या चोरीच्या मालाची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरांनी सुमारे $ 40,000 (सुमारे 29 लाख रुपये) किमतीचे दागिने आणि 15 हजार डॉलर्सची रोकड पळवून नेली आहे. हॉटेलसोबतच स्थानिक पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास करत आहेत. यानंतर 34 वर्षीय मेस्सी, त्यांची पत्नी अँटोनेला आणि त्यांच्या तीन मुलांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.