FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकपचा थरार आता हळूहळू रंगू लागला आहे. साखळी फेरीतील सामन्यात मोठे उलटफेर पाहायला मिळाले. सौदी अरेबियाने अर्जेंटिना आणि जापाननं जर्मनीला पराभूत केल्यानं स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. असं असताना मैदानाबाहेरही फॅन्ससोबत वेगवेगळे घटना घडत आहेत. कतारमध्ये अनेक निर्बंध असल्याने फॅन्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच मैदानाबाहेर फॅन्सना बियर मिळत नाही. त्यामुळे फॅन्स बियर विकत घेण्यासाठी दारोदारी विचारपूस करत आहेत. बियरच्या शोधात असलेले दोन फॅन्स अरबपती शेखच्या महालात पोहोचले. नेमकं तिथे काय झालं? याबाबत फॅन्सनी टॉकस्पोर्टशी बोलताना सांगितलं. त्यामुळे नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अॅलेक्स सुलिवान आणि त्याचे 64 वर्षीय वडील फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी कतारमध्ये आले आहेत. टॉकस्पोर्टशी झालेल्या संवादात दोघांनी सांगितले की, दोहामध्ये उतरताच ते बिअर खरेदी करण्यासाठी रस्त्यावर फिरू लागले. तेव्हा त्यांनी एका शेखसोबत तोंड ओळख झाली. त्यानंतर बोलता बोलता शेखनं ब्रिटीश नागरिकांना सोबत येण्याची ऑफर दिली. यामुळे दोघंही थोडे घाबरले, पण शेखनं पुन्हा विनंती केल्याने आलिशान लॅम्बोर्गिनीमधून महालात आले. तिथे सिंहाच्या पिलासोबत खेळले. ही संपूर्ण घटना त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली.
“We met one of the Sheikh’s sons & he took us back to the palace!”
“We were on the hunt for beers and we ended up at a big palace, we saw his monkeys & exotic birds!”
These England fans are out in Qatar & you HAVE to listen to their story! #FIFAWorldCup #TSWorldCup pic.twitter.com/RlclrsnEsP
— talkSPORT (@talkSPORT) November 20, 2022
अॅलेक्सने द मिररला सांगितले की, त्यांनी आमचा चांगला पाहुणचार केला. आम्हाला त्याच्या लॅम्बोर्गिनीमध्ये फिरायला घेऊन गेला. मी त्याचा व्हिडिओ बनवला आणि सिंहाच्या छाव्यासोबत खेळलो. त्याच्या महालात प्राणीसंग्रहालय होते. सिंह, विविध प्रकारचे पक्षी आणिमाकडे होती. तो या महालाची किंमत सुमारे दोन अब्ज कतारी रियाल इतकी आहे.
बातमी वाचा- दरवाजा उघडल्या उघडल्या Delivery Boy नं केलं महिलेला KISS, नंतर झालं असं की...
23 वर्षीय अॅलेक्स ई-कॉमर्स कंपनीत काम करतो. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकांनी खोटं बोलत असल्याच्या कमेंट्स केल्या होत्या. मात्र अॅलेक्सने व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केल्यानंतर लोकांना खात्री पटली आहे. फुटेज पाहिल्यानंतर एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली की, 'पहिल्यांदा मला ते खोटे वाटले होते पण व्हिडिओ पाहिल्यानंतर माझा त्यावर विश्वास बसला.'