Rohit Sharma reaction viral: वर्ल्डकपसाठी ( World Cup 2023 ) नुकतंच टीम इंडियाची ( Team India ) निवड करण्यात आली आहे. 5 ऑक्टोबर पासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ( Team India ) वर्ल्डकप खेळण्यासाठी उतरणार आहे. मंगळवारी मुख्य सिलेक्टर अजित आगरकर आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांनी पत्रकार परिषद घेऊन टीमची घोषणा केली. यावेळी अजित आगरकर टीमची घोषणा करत असताना रोहित शर्माची ( Rohit Sharma ) एक रिएक्शन व्हायरल होतेय.
आगरकर ज्यावेळी टीमची घोषणा करत होते तेव्हा रोहितही त्याच्यासोबत उपस्थित होता. टीममधील खेळाडूंच्या नावांची घोषणा करताना कर्णधारपदी रोहित शर्माचे नाव घेतलं. त्यावेळी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) एकदम खास रिएक्शन दिलं.
रोहित शर्माची प्रतिक्रिया व्हायरल होतेय ज्यात हिटमॅन कर्णधार म्हणून त्याचं नाव ऐकताच हात वर करून आनंद व्यक्त करताना दिसतोय. हिटमॅनची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. चाहत्यांना रोहित शर्माचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. रोहित शर्माची ( Rohit Sharma ) मस्करी करण्याची सवय प्रत्येकाला माहितीये. अशातच प्रेस कॉन्फ्रेंसमध्येही त्याने मस्करी केलीये.
Team India for World Cup 2023.
Rohit’s reaction pic.twitter.com/FDh4Ah7uq9
— Cricketopia (@CricketopiaCom) September 5, 2023
पत्रकार परिषदेदरम्यान रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला, "टीममध्ये कोणताही आश्चर्याचा धक्का नसून, तुम्ही फक्त 15 जणांनाच संधी देऊ शकता. यावेळी काही खेळाडू नाराज होतील. मी देखील यातून गेलो आहे. त्यामुळे टीममध्ये स्थान न मिळाल्यानंतर कसं वाटतं याची जाणीव आहे. आमच्याकडे अष्टपैलू खेळाडूंचे चांगले पर्याय आहेत. हे सर्वोत्तम 15 खेळाडू आहेत."
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला की, "मी अजून कोणत्याही योजनांबद्दल विचार केलेला नाही. कोण फॉर्ममध्ये आहे आणि आम्ही कोणाविरोधात खेळणार आहोत हे आम्हाला पाहावं लागणार आहे. सर्वोत्तम टीम कोणती असू शकतो हे आम्हाला पाहावं लागेल. जर कोणाला वगळण्यात आलं असेल तर मग काही करु शकत नाही. तुम्हाला संघासाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागतात."
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव