IND vs BAN, Mohammed Shami on Flying Kiss Celebration: भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात जबरदस्त खेळी खेळली. मोहम्मद शमीने या सामन्यात बांगलादेशी फलंदाजांना अक्षरशा उद्ध्वस्त केले. मोहम्मद शमीने बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात १-२ न्हवे तर तब्ब्ल ५ विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीने 5 विकेट घेण्याची ही सहावी वेळ आहे. मोहम्मद शमीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 10 षटके टाकली आणि 53 धावांत 5 विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. मोहम्मद शमीच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने बांगलादेशला 49.4 षटकांत 228 धावांवर रोखले.
बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात मोहम्मद शमीने पाचवी विकेट घेतल्यावर आकाशाकडे पाहिले आणि ‘फ्लाइंग किस’ दिले. हे 'फ्लाइंग किस' देऊन मोहम्मद शमीने आनंद साजरा केला. हे 'फ्लाइंग किस' बघून सामन्यानंतर मोहम्मद शमीनेही खुलासा केला की, ते 'फ्लाइंग किस' कोणाला दिलं होतं. हे फ्लाइंग किस त्याच्या वडिलांसाठी असल्याचे मोहम्मद शमीने सांगितले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत मोहम्मद शमी म्हणाला, "ते फ्लाइंग किस माझ्या वडिलांसाठी होतं. ते माझा आदर्श आहेत. मेहनत माझी आहे, आशीर्वाद त्याचा आहे आणि देणारा वरून आहे. जानेवारी 2017 मध्ये मोहम्मद शमीचे वडील तौसिफ अली यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
हे ही वाचा: टीम इंडियातील दिग्गजावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावलं; Champions Trophy सोडून मायदेशी परतला
मोहम्मद शमीने सौम्या सरकार आणि मेहदी हसन मिराजची विकेट घेतली. यानंतर त्याने झाकेर अली, तंजीम हसन साकिब आणि तस्किन अहमद यांना बाद केले. दुबईत मोहम्मद शमीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा सहा गडी राखून पराभव केला. शुभमन गिलने नाबाद 101 धावा केल्याने भारताने 21 चेंडू बाकी असताना 229 धावांचे लक्ष्य गाठले. शुभमन गिलने केएल राहुलसोबत पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 36 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 41 धावांची जलद खेळी केली, त्यानंतर इतर फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली.