बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा घाम काढला. चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात जसप्रीत बुमरहान एकतर्फी कामगिरी करत भारताचं आव्हान जिवंत ठेवलं. भारताच्या उप-कर्णधाराने तीन विकेट्स मिळत ऑस्ट्रिलेयाची अवस्था 100 धावात 6 बाद अशी केली होती. पण यादरम्यान भारताने अनेक संधी सोडल्या. खासकरुन यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) दुपारच्या सत्रात अनेक झेल सोडले ज्यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला पाहायाल मिळाला.
बुमराहने उस्मान ख्वाजाला टाकलेल्या चेंडूवर पहिला झेल सुटला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिली घटना घडली. यशस्वी हातात आला चेंडू पकडण्यात अयशस्वी ठरला. जवळ उभा असल्याने त्याच्याकडे व्यक्त होण्यासाठी फार कमी वेळ असला तरी हे कारण न चालणारं होतं. 40 व्या षटकात मार्नस लॅबुशेनचा झेलही त्याने सोडला. यावेळी आकाशदीप गोलंदाजी करत होता. त्यावेळी लॅबुशेनचं अर्धशतकही झालं नव्हतं. या झेलसह सामना पूर्णपणे फिरण्याची शक्यता होती. आपण किती मोठी चूक केली आहे हे लक्षात आल्यानंतर यशस्वी जीभ चावत होता. तर दुसरीकड रोहित शर्मा रागात आपलं हात झटकत असल्याचं समालोचकांनी निदर्शनास आणून दिलं.
— The Game Changer (@TheGame_26) December 29, 2024
जैस्वालची चूक असतानाही समालोचक माईक हसीने मात्र रोहितच्या देहबोलीवर टीका केली. त्याने संयम राखणं महत्त्वाचं असून, तरुण खेळाडूंनी असे झेल सोडल्यानंतर संताप व्यक्त करण्याऐवजी शांत राहावं असं तो म्हणाला.
"प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, ही कर्णधाराकडून योग्य देहबोली नाही," असं माईक हसीने फॉक्स क्रिकेटवर सांगितलं. "तो भावनिक आहे आणि त्याला विकेट्स हव्या आहेत याचं कौतुक आहे. पण तूच संघाला संयम आणि पाठीशी असल्याचा संदेश पाठवणं गरजेचं आहे. कोणाचीही झेल सोडण्याची इच्छा नसते. आपण झेल सोडल्याचं आणि खासकरुन लॅबुशेचनचा ड्रॉप केल्याचं त्यालाही वाईट वाटत असणार. ते फार जलद झालं," असं माईक हसी म्हणाला.
ऑस्ट्रेलियाच्या ॲलिसा हिली म्हणाली, "तुम्ही जेव्हा त्याच्यासह मैदानात फलंदाजीसाठी उतराल तेव्हा काही धावा करण्याची आणि तुमच्या देशासाठी कसोटी सामना जिंकण्याच्या प्रयत्नांची अपेक्षा असेल".
जैस्वाल सिली पॉईंटवर असताना 49व्या षटकात झेल सोडण्याची तिसरी घटना घडली. रवींद्र जाडेजाच्या चेंडूवर पॅट कमिन्स फसला आणि चेंडू जैस्वालच्या हातात गेला. पण पुन्हा एकदा त्याच्याकडून झेल सुटला. यावेली रोहित शर्मा पुन्हा एकदा चिडलेला दिसला.