Badminton : महाराष्ट्र बॅडमिंटन असोशिएशनच्या अध्यक्षपदी अरूण लखानी

प्रदीप गंधे यांचा दारूण पराभव

Updated: Sep 27, 2022, 09:43 PM IST
Badminton : महाराष्ट्र बॅडमिंटन असोशिएशनच्या अध्यक्षपदी अरूण लखानी title=

नागपूर - महाराष्ट्र बॅडमिंटन असोशिएशनच्या ( Maharashtra Badminton Asssociation)  आज झालेल्या निवडणुकांमध्ये अरूण लखानी ( Arun Lakhani ) यांचा दणदणीत विजय झाला आहे. लखानी हे सलग तिसऱ्यांदा एमबीए चे अध्यक्ष ( MBA President ) बनत आहेत. अरूण लखानी यांनी आपले नजिकचे प्रतिस्पर्धी प्रदीप गंधे ( Pradip Gandhe) यांचा 37-15 अशा मोठ्या फरकाने पराभव केला आहें. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती तसेच स्थानिक खेळाडूंना प्राधान्य या मुद्द्यांवर अरूण लखानी यांनी ही निवडणूक लढली होती. अरूण लखानी यांच्या पॅनेल मधील २५ उमेदवार निवडून आले तर एक उमेदवार अवघ्या एका मताने पराभूत झाला. 

यंदाची MBA निवडणूक अतिशय चुरशीची होईल असं बोललं जात होतं. मात्र बॅडमिंटनला नवी ऊंची मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांमुळे आपला विजय सोपा झाला असं एमबीए चे अध्यक्ष अरूण लखानी सांगतात. राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा घेणे, स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याची सधी उपलब्ध करून देणे या उपक्रमांमुळे आपल्याला भरघोस पाठींबा मिळाला असं अरूण लखानी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. २०२२ ते २०२६ असा या नविन कार्यकारिणीचा कार्यकाळ असणार आहे.  

निवडणूकीत अक्षय देवळीकर यांची उपाध्यक्ष तर शिरिष बोराळकर यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवड झालीय.

arun lakhani elected as presedent of Maharashtra badminton association for third consecutive time