Arjun Tendulkar : आयपीएलच्या 16 (IPL 2023) व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) अखेर आयपीएलमध्ये डेब्यू केला. इतकंच नाही तर दुसऱ्या सामन्यात त्या विकेट घेत त्याच्या करियरमधील पहिली विकेट देखील पटकावली आहे. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने विकेट घेत मुंबईला विजयही मिळवून दिला. अशातच आता गोलंदाजीनंतर अर्जुनने (Arjun Tendulkar) फलंदाजीमध्येही तो कोणापेक्षा कमी नाहीये हे दाखवून दिलंय.
अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अर्जुन नेट्समध्ये फलंदाजीची प्रॅक्टिस करतोय.
अर्जुनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले असून यामध्ये त्याला केवळ गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. अशातच आता अर्जुनने नेट्समघ्ये फलंदाजीची प्रॅक्टिस केली आहे. नेट्समध्ये फलंदाजी करतानाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलाय. अर्जुनची (Arjun Tendulkar) ही फलंदाजी पाहून पुढच्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याचीही संधी मिळू शकते.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये (Arjun Tendulkar Video viral) अर्जुन मोठे मोठे षटकार लगावताना दिसतोय. मुंबईने शेअर केलेल्या या व्हिडीओवरून आता अर्जुन आगामी सामन्यात फलंदाजी पण करणार का, असा सवाल चाहत्यांकडून विचारला जातोय.
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. या सामन्यात अर्जुनने 2 ओव्हर फेकत 17 रन्स दिले. तर सनरायझर्स विरूद्धच्या सामन्यात अर्जुनने 2.5 ओव्हर फेकत 1 विकेट देखील काढली. या सामन्यामध्ये अर्जुनने 6.35 च्या इकोनॉमीने गोलंदाजी केली होती.
so good, you'd think it was their first job Look again #OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/2QRlreAOID
— Mumbai Indians (@mipaltan) April 19, 2023
आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये मुंबईने आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. यापैकी सलग 3 सामन्यांत मुंबईने विजय मिळवलाय, तर सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. तर शनिवारी मुंबईचा पुढचा सामना पंजाब किंग्जशी (Punjab Kings) होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार असून या सामन्यात देखील अर्जुनला संधी मिळण्याची शक्यता आहे.