Weekly Tarot Horoscope Prediction 23 to 29 september 2024 in Marathi : पितृपक्षाचा या आठवड्यात बुधादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. हा राजयोग अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी मानला जातो. हा राजयोग काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली सिद्ध होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात 12 राशींसाठी कसा असेल सप्टेंबरचा शेवटचा आठवडा टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून
या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा शेवटचा आठवडा फारसा अनुकूल नसणार आहे. त्यामुळे स्वतःला मर्यादित ठेवा. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढविण्यात काही गरजे नाही. सहकारी आणि मित्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे तुमच्यासाठी चांगले ठरणार आहे. तसंच, आठवडा तुमच्या आरोग्यासाठी चांगला नसणार आहे.
बुधादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे या राशीसाठी खूप चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. तुम्हाला काही नवीन खरेदी करायची असेल तर त्यासाठीही आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुम्ही नवीन फायदेशीर संबंध निर्माण करणार आहात. या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित सर्व कामं आरामात करणार आहात.
या राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काही तणावाचा सामना करावा लागणार आहे. तुम्ही अलीकडे केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षित नफा न मिळाल्याने तुम्हाला थोडे तणावाचे वाटणार आहे. या आठवड्यात शक्य तितके तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि संयम ठेवा. या आठवड्यात तुमचे प्रेम जीवन खूप रोमँटिक आणि प्रेमाने भरलेले असणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती अनुकूल नाही. या आठवड्यात तुमचा तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावर मतभेद होणार आहेत. या आठवड्यात पती-पत्नीने एकमेकांसोबत थोडा वेळ घालविणे हिताच ठरणार आहे. विखुरलेल्या गोष्टींची पुनर्रचना करण्यात ऊर्जा गुंतवा फायदेशीर ठरेल.
या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा शेवटचा आठवडा खूप छान असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला बुधादित्य राजयोगातून लाभ आणि प्रगतीच्या अनेक चांगल्या संधी मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला एकापाठोपाठ अनेक यश मिळणार आहेत. या आठवड्यात तुम्ही विजयाच्या मार्गावर वाटचाल करणार आहात. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला असणार आहे. या आठवड्यात त्यांना काही मोठे यश मिळणार आहे.
या राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या वागण्याबाबत थोडे सावध राहावं लागणार आहे. या आठवड्यात तुमच्या आक्रमक वर्तनावर थोडे नियंत्रण ठेवा अन्यथा समस्या निर्माण होतील. घरातील वातावरणही चांगले नसणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होऊ शकतात. जर तुम्ही स्वतःला नियंत्रणात ठेवलं तर तुम्ही बऱ्याच अंशी यशस्वी होणार आहात.
या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा शेवटचा आठवडा उत्कृष्ट ठरणार आहे. आत्तापर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवत आहे. तर या आठवड्यात तुमचा दबाव बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आनंदी वातावरणात वेळ घालवणार आहात. या आठवड्यात तुम्हाला एक नवीन ऊर्जा आणि उत्साह लाभणार आहे.
या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी व्यवसाय आणि धार्मिक प्रवासाची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तसंच, या आठवड्यात तुम्हाला काही विशेष लाभ आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळणार आहे.
या राशीच्या लोकांना या आठवड्यात थोडे सावध राहावे लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाला जायचे असेल तर आधी तुमच्या प्रियकराची आठवण करणार आहात. तसंच, सट्टेबाजीवर लक्ष केंद्रित करू नका आणि जोखमीचे काम विचारपूर्व करा. तुमच्या कार्यक्षेत्रात येणारे अडथळे सोमवारी दूर होणार आहात.
या राशीच्या नोकरदार लोकांसाठी हा आठवडा जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडणार आहेत. या आठवड्यात तुम्ही काही लोकांच्या संपर्कात याल जे तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम करणार आहेत. तुम्ही सध्या करत असलेले संपर्क भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.
या राशीच्या लोकांना या आठवड्यात बुधादित्य राजयोगामुळे त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तुमच्या मुलांच्या किंवा भावंडांच्या विवाहात काही अडथळे असतील तर ते या आठवड्यात दूर होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी काळ अतिशय अनुकूल असणार आहे. तोही चांगली कामगिरी करणार आहात. तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठण्यात तुम्ही यशस्वी होणार आहे. या आठवड्यात तुमचे एखादे मोठे स्वप्न साकार करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात.
बुधादित्य राजयोगामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना स्पर्धात्मक यश मिशणार आहे. साहित्य आणि संगीतातील तुमच्या रुचीचाही तुम्हाला फायदा होईल. मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबतीत तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास आणखी काही वेळ लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला इतरांची जास्त कामे करून घ्यावी लागणार आहेत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)