Malavya Rajyog : येणारं नवीन वर्ष हे आपल्यासाठी कसं असेल हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. वैदिक ज्योतिषशास्त्र ग्रहांच्या स्थितीवरून येणारं वर्षात हे 12 राशींच्या लोकांसाठी कसं असेल याबद्दल सांगत असतं. 2024 मध्ये पंचमहापुरूष योगांपैकी असा एक राजयोग तयार होणार आहे. सुख, समृद्धी आणि सौभाग्यचा कारक शुक्रामुळे तयार होणाऱ्या मालव्य योग अनेक राशींचं भाग्य बदलणार आहे. या राशींच्या कुंडलीत शुक्र राशीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घरात वृषभ, तूळ किंवा मीनमध्ये असल्यास मालव्य राजयोग निर्माण होतो. (Malavya Rajyoga in 2024 due to transit of Venus These zodiac signs will get a lot of money along with financial benefits)
ज्योतिष शास्त्रानुसार संपत्तीचा कारक शुक्र 31 मार्चला दुपारी 4.54 वाजता मीन राशीत गोचर करणार आहे. हा योग एकादा नाही तर नवीन वर्षात अजून दोन वेळा तयार होणार आहे. 19 मे आणि 18 सप्टेंबरला मालव्य योग निर्माण होईल. चला मग कुठल्या राशींना फायदा होणार जाणून घेऊयात.
या राशीच्या दहाव्या स्थानी मालव्य राजयोग निर्मिती होणार आहे. या लोकांच्या दारावर सुखासोबत वाहन, घर आणि मालमत्ता खरेदी योग चालून येणार आहे. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्या आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळं मिळणार आहे. व्यवसायात अफाट यश मिळणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं आणि पैसे परत मिळणार आहे.
या राशीच्या नवव्या स्थानी मालव्य योग निर्माण झाला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना मार्च महिन्यापासून अफाट यश मिळणार आहे. आर्थिक संकटातून तुम्हाला या राजयोगामुळे दिलासा मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळणार आहे. वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणार आहे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढणार असून घरात आनंदाचं वातावरण असणार आहे.
या राशीच्या सातव्या स्थानी मालव्य राजयोगाची निर्मिती या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कुटुंबाबरोबर आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुम्ही प्रत्येक काम यशस्वी होणार आहात. शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून तुम्हाला दिलासा मिळणार आहे. या काळात तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह सहलीला जाण्याचे बेत आखणार आहात. तुमच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे समाजात मान सन्मान वाढणार आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार केल्यास भविष्यात तुम्हाला द्विगुणीत फायदा होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)