Roll Out Roti on Kitchen Slab : घराच्या रचनेपासून त्यातील वस्तूबद्दल वास्तूशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आले. वास्तूशास्त्रानुसार घराची रचना आणि त्यातील वस्तू याचा परिणाम सुख समृद्धी आणि प्रगतीवर होत असतो. वास्तूशास्त्रात स्वयंपाक घराबद्दलही काही नियम सांगितलंय. शास्त्रानुसार चपाती किंवा भाकरी करण्यासंबंधातही काही नियम सांगितले आहेत. चपाती करताना पहिली चपाती गायीसाठी आणि शेवटची श्वानासाठी केली जाते. आजही परंपरा पाळली जाते. किचनमधील गोष्टी कशी ठेवाव्यात, त्याबद्दल नियम आहे. या वस्तू योग्यरित्या न ठेवल्यास घरावर संकट, धनहानी होते, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय.
आज प्रत्येक घरामध्ये मॉड्यूलर किचन आहे. त्यामुळे नवीन पिढीचे तरुण तरुणी या किचनमध्ये एकत्र स्वंयपाक बनवण्याचा आनंद घेत असतात. मॉड्यूलर किचन असल्यामुळे किचनच स्लॅब इतकी गुळगुळीत असतं की चपाती किंवा भाकरीसाठी ते एकदम परफेक्ट असल्याच ते मानतात. पण या स्लॅबवर चपाती बनवणे वास्तूशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ, योग्य आहे की अयोग्य जाणून घ्या.
वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात वापरली जाणारी रोलिंग पिन सुख-समृद्धीचा कारक मानली जाते. चक्ला-बेलन राहु-केतूशी संबंधित असतो. या कारणामुळे या दोन ग्रहांचा प्रभाव घरामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. यामुळेच चकले-बेलन खरेदीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहेत. त्याच वेळी, चपाती लाटताना चकला-बेलनचा वापर खूप महत्वाचा मानला जातो. असे मानले जाते की चपाती बनवताना या दोन्हींचा वापर केल्यास घरात समृद्धी नांदते.
पण जर तुम्ही चकले-बेलन न वापरता स्लॅबचा वापर केल्यास चपाती छान गोल होते. पण त्याचा परिणा घरातील सुख, शांती आणि समृद्धीवर पाहिला मिळतो. या तिन्ही गोष्टींवर त्याचा नकारात्मक परिणाम दिसतो. काही समजुतींनुसार, स्वयंपाकघरात चकले-बेलन वापरून चपाती लाटल्यास घरात समृद्धी येते आणि राहू-केतू सारख्या ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण होते. त्यांचा योग्य वापर केल्यास घरातील वातावरण संतुलित राहण्यास मदत मिळते.
वास्तुशास्त्रात चपाती लाटण्यासाठी चकले-बेलन विशेष महत्त्व असतो. घराच्या सुख-समृद्धीसाठी हे शुभ मानले जाते. चपाती लाटताना चकल्या-बेलनचा वापर केला नाही तर घरामध्ये गरिबी आणि पैशाची कमतरता निर्माण होऊ शकते. याशिवाय अन्न आणि समृद्धीची देवी मानल्या जाणाऱ्या माता अन्नपूर्णाची कृपाही कमी होऊ शकते.
याउलट जर चपाती किंवा भाकरी स्लॅबवर लाटली तर वास्तुशास्त्र नकारात्मक मानली जाते. हे घरातील अशुभ ग्रहांचा प्रभाव म्हणून पाहिले जाते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या यशावर आणि कल्याणावर विपरित परिणाम होतो.