Horoscope १७ फेब्रुवारी २०२२ : कुणा खास व्यक्तीसोबतची भेट ठरणार खास

असा असेल आजचा गुरूवार, १२ राशीचं भविष्य ठरेल खास 

Updated: Feb 17, 2022, 07:30 AM IST
Horoscope १७ फेब्रुवारी २०२२ : कुणा खास व्यक्तीसोबतची भेट ठरणार खास title=

मुंबई : गुरूवारी सिंह (Leo) राशीच्या लोकांना व्यापार-व्यवसायात लाभ होणार आहे. तसेच तूळ (Libra) राशीच्या लोकांनी ठरवलेली सर्व काम चोख पार पडतील. (Horoscope Today Thursday 17 February 2022 ) तर पाहूया कसा असेल आजचा गुरूवार. 

मेष : या गुरूवारी तुम्हाला तुमच्या कुटुंबाच सुख मिळेल. मंगल कार्य घरी घडतील. आज एका खास व्यक्तीची भेट होईल. आणि ती भेट स्मरणात राहिल. मनात नवा उत्साह आणि जोश असेल. प्रेम संबंधात तुम्हाला यश मिळेल. 

वृषभ : गुरूवारी व्यापारी वर्गात मोठं यश प्राप्त होईल. धनलाभ होणार आहे. कार्यक्षेत्रात मोठा बदल होईल. कुटुंबाकडून आज दिरंगाई पाहायला मिळेल. 

मिथुन : गुरूवारचा दिवस उत्साहात भरला आहे. मंगल कार्य घरात घडतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मदत होईल. भाग्याचा दिवस आहे. व्यापार- व्यवसायात गुरूवारचा दिवस महत्वाचा. 

कर्क : गुरूवारचा दिवस शुभ असेल. कामात आज यश मिळेल. प्रशंसा होईल. दाम्पत्यांना जीवनात आनंद मिळेल. कुटुंबात चांगला वेळ घालवाल. 

सिंह : गुरूवारचा दिवस चांगला असेल. शरीरात उत्साह भरलेला असेल. नोकरदार वर्गासाठी चांगला दिवस असेल. गुरूवारी खूप यश मिळेल. 

कन्या : गुरूवारी आजचा दिवस ठरेल कन्या राशीसाठी ठरेल खास. आज मन प्रसन्न राहील. कार्यात यश प्राप्त होईल. आज नवीन काम मिळेल. 

तूळ : गुरूवारी कामात यश मिळेल. सफलता मिळेल. कार्यात नवीन योजना सुरू कराल. आजच्या दिवशी कौतुकाचा वर्षाव होईल. कामात यश प्राप्त होईल. 

वृश्चिक : गुरूवारचा दिवस चांगला असेल. ज्ञानत भर पडेल. वैचारिक वाढ होईल. कार्यात निपुणता प्राप्त होईल. 

धनू : गुरूवारचा दिवस खास ठरेल. मेहनतीने यश प्राप्त होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी परदेशात जाण्याचा योग येणार आहे. गुरूवारचा दिवस ठरेल खास. मित्र परिवारासोबत चांगला वेळ घालवाल. 

मकर : गुरूवारी कार्यक्षेत्रात यश प्राप्त होईल. आजचा दिवस धनलाभाचा होईल. गुरूवारचा दिवस उत्साहाने भरलेला आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. 

कुंभ : गुरूवारचा दिवस खूप व्यस्त असेल. व्यापारात लाभ होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. उधार दिलेला पैसा पु्न्हा मिळेल. गुरूवारचा दिवस महत्वाचा आहे. धनलाभ होईल. 

मीन : गुरूवारच्या दिवशी मंगल कार्य होतील. आज तुमचं मन प्रसन्न ठेवाल. खूप दिवसानंतर अशी चांगली संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करा.