Ganesh Visarjan 2024 Facts: आज गणेश भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या 14 व्या दिवशी गणरायाचं विसर्जन केलं जात आहे. अनंत चतुर्दशीचा दिवस हा गणेशोत्सवाची सांगता मानली जाते. या दिवशी लोक गणपतीची विधिवत पूजा करुन त्यांना निरोप देतात. तसेच 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला लवकरात लवकर पुन्हा भेटीस ये अशी प्रेमळ सादही घालतात. मात्र आज गणपतीला निरोप देताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबद्दल...
> गणेश विसर्जन करताना गणपतीच्या मूर्तीचं मुख हे घराच्या बाजूला असलं पाहिजे. म्हणजेच गणराय हे घराकडे पाहत आहेत अशा पद्धतीने मूर्ती विसर्जित केली पाहिजे. विसर्जनाच्या वेळी घराकडे पाठ करुन मूर्ती विसर्जित केली तर गणराय घरावर नाराज होतो असं मानतात. गणरायाला पाठ फिरवणं म्हणजे दारिद्र्याची निशाणी समजलं जातं. म्हणूनच विसर्जन करताना गणरायाची पाठ कधी घराकडे असू नये असं सांगितलं जातं.
> विसर्जनाच्या वेळी गणरायांची पाठ घराकडे असेल तर घरात नारात्मक ऊर्जाचा प्रवेश होतो असं म्हटलं जातं.
> विसर्जनाच्या आधी संपूर्ण कुटुंबाने सुख, समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना करावी. तसेच आपल्या सर्व चुकांसाठी बाप्पाची माफी मागावी.
> मुहूर्तानुसारच बाप्पाला निरोप दिला पाहिजे.
> विसर्जनाच्या वेळी तामसिक गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे.
नक्की वाचा >> 4 लाखांच्या खऱ्या सोनसाखळीसहीत गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केलं; घरी आल्यावर...
यंदाच्या वर्षी पंचांगानुसार गणपतीचं विसर्जन सकाळी 6 वाजून 7 मिनिटांपासून करता येईल. गणेश विसर्जन सकाळी 9 वाजून 11 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 47 मिनिटांपर्यंत करता येईल. त्याचप्रमाणे दुपारी 3 वाजून 19 मिनिटांपासून सायंकाळी 4 वाजून 51 मिनिटांपर्यंत गणपतीचं विसर्जन करता येईल.
पौराणिक कथांनुसार, श्रीवेद व्यास यांनी गणेश चतुर्थीपासून श्रीगणेशाला महाभारताची कथा सलग 10 दिवस ऐकवली होती. 10 दिवसांनंतर वेद व्यास यांनी डोळे उघडून पाहिले तर त्यांना दिसले की, 10 दिवसांच्या मेहनतीने गणेशाचे तापमान खूप वाढले होते. यामुळे वेद व्यास यांनी श्रीगणेशाला तात्काळ जवळच्या तलावात जाऊन थंड पाण्याने स्नान करायला सांगितले. त्यामुळे गणेशाची स्थापना करुन चतुर्थीला मूर्ती पाण्याने थंड केली जाते, असे म्हणतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)