February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, 'या' राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

February Grah Gochar : फेब्रुवारी महिन्यात 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर पडणार आहे. काहींसाठी हा शुभ तर काहींसाठी हा अशुभ ठरणार आहे. फेब्रुवारी महिना कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Jan 27, 2024, 07:00 AM IST
February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, 'या' राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ  title=
February Grah Gochar Transit of 5 planets with Sun Saturn in February the bank balance of these zodiac signs will increase in bank balance

February Grah Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. फेब्रुवारी महिन्यात या 9 ग्रहांपैकी 5 ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध, मंगळ, शनि, शुक्र आमि सूर्य संक्रमण करणार आहे. ग्रहांच्या या गोचरमुळे काही राशींना अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. पण फेब्रुवारी महिना कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे जाणून घ्या. 

कुठला ग्रह कुठल्या दिवशी गोचर करणार?

1 फेब्रुवारी 2024 - बुध मकर राशीत गोचर

5 फेब्रुवारी 2024 - मंगळ मकर राशीत गोचर 

8 फेब्रुवारी 2024 - बुध मकर राशीत गोचर 

11 फेब्रुवारी 2024 - शनि कुंभ राशीत अस्त

12 फेब्रुवारी 2024 - शुक्र मकर राशीत गोचर 

20 फेब्रुवारी 2024 - बुध कुंभ राशीत गोचर 

ग्रहांच्या या संक्रमणामुळे त्रिग्रही योग, चतुग्रही योग आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. या संक्रमणामुळे 6 राशींना आर्थिक लाभासह यशाचा मार्ग गवसणार आहे.  (February Grah Gochar Transit of 5 planets with Sun Saturn in February the bank balance of  these zodiac signs will increase in bank balance)

मेष रास (Aries Zodiac) 

फेब्रुवारी महिन्यात या राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. तुमच्या राशीच्या दहाव्या घरात बुधादित्य आणि आदित्य मंगल योगाचा सकारात्मक परिणाम पडणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होणार आहे. राजकारणात तुमचा प्रभाव वाढणार आहे. समाजातही तुमचा प्रभाव वाढणार आहे. लोकांमध्ये तुमची लोकप्रियता अधिक असेल. नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला फायदा होईल. 

वृषभ रास (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप शुभ ठरणार आहे. परदेशात शिक्षण आणि उच्च शिक्षणात यश मिळणार आहे. तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत असणार आहे. धार्मिक कार्य आणि तीर्थयात्रा यांचा योग तुमच्या नशिबात आहे. धार्मिक प्रवास तुम्हाला घडणार आहे. तसंच तुमच्या घरात काही शुभ कार्य देखील घडणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमचं वडील किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून लाभ मिळणार आहे. हा महिना तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी खूप फलदायी असणार आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या स्थितीमुळे कर्क राशीच्या लोकांच्या मान-सन्मानासाठी फायदेशीर ठरणार आहे. तसंच तुम्हाला कोणत्याही सरकारी क्षेत्रात लाभ आणि यश मिळणार आहे. या महिन्यात केलेली गुंतवणूक तुम्हाला यशदायी ठरणार आहे. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यांच्या प्रयत्नांना या महिन्यात यश मिळणार आहे. नोकरीतही तुम्हाला पूर्ण सन्मान लाभणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)   

 

फेब्रुवारी महिन्यात या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून आनंद मिळणार आहे. वैवाहिक जीवन आणि कुटुंबात उत्साहाच वातावरण असणार आहे. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळणार आहे. प्रेमसंबंधात उत्साह असणार आहे. नात्याला पुढे नेण्यासाठी तुम्ही यशस्वी होणार आहात. नोकरी व्यवसायात वाढ आणि लाभ होणार आहे. 

तूळ रास (Libra Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना ग्रह स्थितीच्या दृष्टीने अत्यंत फलदायी आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक असणार आहे. या महिन्यात तुमच्या राशीचा स्वामी शुक्र चौथ्या भावात असणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे भौतिक सुखामध्ये वाढ होणार आहे. याशिवाय तुमची आर्थिक बाजूही खूप मजबूत होणार आहे. या महिन्यात तुमची बचतही होणार आहे. नोकरदार लोकांसाठीही महिना चांगला आणि लाभदायक असणार आहे. 

मकर रास (Capricorn Zodiac)  

मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य, बुध आणि मंगळाचं संक्रमण करिअरमध्ये प्रगती आणि लाभ घेऊन येणार आहे. या महिन्यात तुम्हाला प्रमोशन देखील मिळणार आहे. तुमच्या पदोन्नतीची शक्यता प्रबळ असणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या वडिलांकडून लाभ मिळणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबी तुम्हाला फायदा होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या