Mangal Gochar In Tula Rashi: ज्योतिश्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशींमध्ये बदल करतात. यावेळी मंगळ जो ग्रहांचा सेनापती आहे तो 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:12 वाजता ते तूळ राशीत प्रवेश केला. यावेळी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.04 वाजेपर्यंत ते या राशीत असणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर करणार असून अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार तूळ रास न्याय, सौंदर्य, सुसंवाद दर्शवते. अशा स्थितीत मंगळाचा या राशीत प्रवेश झाल्याने अनेक राशींच्या जीवनात बदल घडणार आहे. यामुळे वैवाहिक जीवन, कायदेशीर भागीदारी, व्यवसाय इत्यादींमध्ये मोठे बदल होणार आहेत. जाणून घेऊया तूळ राशीत मंगळाच्या प्रवेशाने कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे ते पाहुयात.
मंगळाच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांना लाभ मिळण्याची आशा असते. या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत लाभ मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बदल दिसून येतील. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ नाही. तुम्ही उच्च शिक्षण घेण्यात यशस्वी व्हाल.
मंगळाच्या तूळ राशीत प्रवेशाने या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. तुम्ही घर, वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता. भविष्यात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. जास्त नफ्यामुळे तुमच्या कंपनीला फक्त नफा मिळण्याची शक्यता आहे. समाजातील लोकांमध्ये तुमचा आदर वाढणार आहे. व्यावसायिक जीवनातही प्रगती होण्याची शक्यता आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर यश आणि नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
मंगळाच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. मंगळ तुमच्यात आत्मविश्वासाने भरेल. या काळात तुम्हाला मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक भागीदारीमध्ये तुम्हाला भरपूर यश आणि आर्थिक लाभही मिळणार आहेत. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )