Dussehra 2024 : यंदा विजयादशमीला अशुभ संकेत; चुकूनही करू नका 'हे' काम

Dussehra 2024 date : आश्विन शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दुर्गा देवीने महिषासुराचा तर लंकेत श्रीरामाने रावणाचा वध केला होता. म्हणून यादिवशी विजयादशमी किंवा दसरा सण साजरा करण्यात येतो. यंदा दसऱ्याला अशुभ संकेत निर्माण झाले आहेत.   

नेहा चौधरी | Updated: Oct 6, 2024, 01:50 PM IST
Dussehra 2024 : यंदा विजयादशमीला अशुभ संकेत; चुकूनही करू नका 'हे' काम title=
Dussehra 2024 ashubh signs for Vijayadashami this year Dont do this Home entry vehicle purchase by mistake

Dussehra 2024 date : शारदीय नवरात्रीला सुरु असून दररोज दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जात आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला देवीचं विसर्जन करुन विजयादशमी साजरी करण्यात येते. पौराणिक कथेनुसार यादिवशी माता दुर्गेने महिषासुराचा तर लंकेत श्रीरामाने रावणाचा वध केला होता. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि विजयचा उत्साह साजरा करण्यात येतो. साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा दसऱ्याचा दिवशी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते. यादिवशी लोक सोने खरेदीपासून वाहन खरेदी, घर, गृहप्रवेशासह अनेक शुभ कार्य करतात. पण यंदा दसऱ्याचा दिवशी अशुभ संकेत मिळत आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. (Dussehra 2024 ashubh signs for Vijayadashami this year Dont do this Home entry vehicle purchase by mistake) 

विजयादशमीच्या दिवशी अबूझचा मुहूर्त असूनही दसऱ्याचा दिवश शुभ मानला जात नाहीय.  याशिवाय विजयादशमीला काही काम करण्यासही मनाई आहे. यावेळी विजयादशमी अशुभ असण्यामागील कारण आणि कोणत्या गोष्टी करण्यास मनाई आहे हे ज्योतिषाकडून जाणून घेऊया...

दसरा कधी आहे?

यावर्षी विजयादशमी तिथी 12 ऑक्टोबरला सकाळी 11:05 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:54 वाजेपर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत उदयातिथी लक्षात घेऊन विजयादशमी 12 ऑक्टोबरलाच साजरी केली जाणार आहे. 

ज्योतिषी प्रितिका मोजुमदार यांच्या मते, हिंदू धर्मात विजयादशमीला विशेष महत्त्व आहे. तसंच प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. त्यानुसार देवीच्या येण्यापासून ते जाण्यापर्यंतचा प्रवास ठरवला जातो. यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये माँ दुर्गा डोलीत येते. माता राणीचे डोलीत येणे अशुभ मानलं गेलंय. तर देवीचं विसर्जन विजयादशमीच्या दिवशी होते. यंदा विजयादशमी शनिवारी आली असून यादिवशी दुर्गादेवी मोठ्या नख्या असलेल्या कोंबड्यावर परतणार आहे. हे देखील अशुभ संकेत मानले जात आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे अशुभ मानले जात आहे. 

दसऱ्याला 'या' गोष्टी करू नका!

जर तुम्ही या वर्षी विजयादशमीला गृहप्रवेश करण्याचा विचार करत आहात, त्याशिवाय जमीन किंवा वाहन खरेदी करणार तर ही गोष्ट करु नका. तसंच तुम्ही तुमच्या मुलीला सासरच्या घरी पाठवण्याचा विचार करत असाल तर अजिबात करू नका. विजयादशमी शनिवारी असल्याने ती अशुभ ठरली आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. अन्यथा नकारात्मक परिणामांना सामोरे जावं लागेल, असा इशारा त्यांनी दिलाय. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)