Birthday Wish : वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता का देऊ नये?

Birthday Wish : मित्रमंडळी मध्यरात्री आपल्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. शुभेच्छा देणे केव्हाही चांगले असते. पण रात्री 12 वाजता का शुभेच्छा देऊ नये...

Updated: Oct 1, 2022, 09:49 AM IST
Birthday Wish : वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता का देऊ नये? title=

Birthday Wish midnight at 12 pm : मित्रमंडळी मध्यरात्री आपल्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wish) देत असतात. शुभेच्छा देणे केव्हाही चांगले असते. ज्यांना आपण शुभेच्छा देतो, त्यांनीही खूप मस्त किंवा बरे वाटते. एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाला तुम्ही मध्यरात्री शुभेच्छा देता का? तसे असेल तर जाणून घ्या रात्री 12 वाजता का शुभेच्छा देऊ नये...

आपल्या जीवनातील जन्मदिन हा अतिशय महत्वाचा दिवस असतो. आपण खूप आनंदी असतो. वाढदिवस साजरा करतो. काही जण आपला वाढदिवस गरीब कुटुंबांसोबत किंवा मुलांबरोबर साजरा करतात. तर कोणी वाढदिनी भेटवस्तू किंवा खाद्य पदार्थांचे वाटप करतात. तर अनेक जण समाजोपयोगी काम करतात. रक्तदान करतात. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी व्यक्ती भावनिकरित्या आपल्याशी जोडलेला असतो. 

जन्मदिन अर्थात वाढदिवस. वाढदिवस हा आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. म्हणूनच या दिवशी आपण उत्साहात असतो. वाढदिवस साजरा करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा व्यक्ती आपल्याशी जोडलेली असतो. त्यामुळे आजकाल नातेवाईक असू द्या की जवळच्या मित्रमैत्रिणी, त्यांच्या वाढदिवशी आपण शुभेच्छा देत असतात. परंतु सर्वाध आधी शुभेच्छा देण्याच्या नादात रात्री 12 वाजता शुभेच्छा देण्याची पद्धत रुढ होताना दिसत आहे. विशेषत तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. मात्र, रात्री शुभेच्छा देणे योग्य नाही. कारण...

आपले शास्त्र आणि धर्म समजून घेतले तर ध्यानात येईल की, ही पद्धत खूपच चुकीची आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वातावरणात रज आणि तम गुणांचे प्राबल्य असते. यावेळी नकारात्कम शक्तीदेखील अधिक प्रभावी असतात. त्यामुळे रात्री 12 वाजता दिलेल्या शुभेच्छा फलदायी नसतात. (Why do friends wish for our birthdays at midnight?)

हिंदू संस्कृतीनुसार दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते. सकाळची वेळ ही ऋषी मुनींच्या साधनेची असते. यावेळी वातावरणात सात्विकता अधिक असते. सूर्योदयाच्या वेळी दिल्या गेलेल्या शुभेच्छा अधिक फलदायी ठरतात. त्यामुळे जन्मदिवसाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता न देता सकाळी देणे चांगले. तुमच्या मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस आहे. तुम्ही त्यासाठी त्यांना शुभेच्छा देता. मात्र, या शुभेच्या देताना थोडा विचार करा आणि रात्री 12 वाजता शुभेच्छा देण्याचे टाळा. रात्री 12वाजता शुभेच्छा देणं चांगले नाही. त्यामुळे तुम्ही दिलेल्या शुभेच्छा बिनकामाच्या ठरतात. 

 

 (Disclaimer:  येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याबाबत ZEE 24 TAAS  याची पुष्टी करत नाही.)