Horoscope 2 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी कठोर परिश्रम देखील करावे लागतील, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. तुमच्या मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी जोडीदाराबरोबर काही कारणास्तव वाद होईल. तुम्ही कठीण परिस्थितीतही गोंधळून जाण्याची दाट शक्यता आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी चांगली संधी आहे.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी आवश्यक कामे वेळेवर पूर्ण करा. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि तुमच्या आवडीचे काम करा.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी वैवाहिक जीवन आनंदी राहील. उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळू शकतो.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी कोणाच्याही विनाकारण बोलण्यात गुंतू नका. आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. एखादी व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन मित्र भेटतील. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी तुमच्या घरातील छोट्या-छोट्या गरजा पूर्ण कराल. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. तुमचे मन भक्तीमध्ये गुंतलेले असेल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. व्यावसायिक लोकांनाही कामात चांगला फायदा मिळेल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी जवळच्या व्यक्तीच्या नुकसानामुळे तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल. या राशीच्या लोकांसाठी दिवस तणावपूर्ण जाणार आहे.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मित्रांचे सहकार्य आज तुमच्यासाठी फार मोलाचे ठरणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )