Chandra Grahan 2024 : ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे मात्र वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानलं जातं. यावर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे होळी सणाला म्हणजे 25 मार्चला असणार आहे. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीत होणार आहे. चंद्रग्रहण 25 मार्चला सकाळी 10.24 वाजेपासून सुरु होणार असून दुपारी 3.02 वाजेपर्यंत असणार आहे. हे ग्रहण पेनम्ब्रल चंद्रग्रहण असणार असून ते भारतात दिसणार नाही. चंद्रग्रहण हे काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना चंद्रग्रहण काळात सावध राहायची गरज आहे ते पाहूयात. (Chandra Grahan 2024 People of this zodiac sign should be careful from lunar eclipse Big changes in life)
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होणारे चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे आर्थिक नुकसान होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. कुटुंबातील सदस्यासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
मार्चमध्ये होणारे चंद्रग्रहण कर्क राशीसाठी अशुभ ठरणार आहे. ग्रहणामुळे तुम्हाला मानसिक समस्यांमधून जावं लागणार आहे. कामामुळे कुटुंबात तणाव निर्माण होणार आहे. विवाहित लोकांचे जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे.
वैवाहिक जीवनात तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. प्रेम जीवनात भागीदारांमध्ये मतभेदाची परिस्थिती निर्माण होणार आहे. घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कन्या राशीशी संबंधित लोकांना चंद्रग्रहणाच्या काळात विशेष सावध राहावं लागणार आहे.
चंद्रग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. तुम्हाला शारीरिक त्रासाचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय घर आणि ऑफिसमध्ये मानसिक तणाव वाढणार आहे.
चंद्रग्रहण हे मीन राशीसाठी अशुभ ठरणार आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शारीरिक दुखापतीमुळे समस्या निर्माण होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. स्वाभिमान दुखावला जाणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)