Lakshmi Narayan Yog And Budhaditya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाने 9 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश केला. यावेळी मीन प्रवेश करताच बुध ग्रहाने सूर्य आणि शुक्र यांच्याशी संयोग निर्माण झाला आहे. त्याचबरोबर मीन राशीमध्ये शुक्र आणि बुध यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे.
सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होतोय. हे दोन्ही राजयोग अनेक वर्षाने तयार होताना दिसतायत. अशातच या राजयोगांच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. काही राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत. तर काही राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी नेमक्या कोणत्या आहेत.
लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील. तुम्ही दीर्घकाळ दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी फायदे मिळतील. तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करू शकता.
लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळही मिळेल. व्यवसायात गुंतवलेले पैसे आता परत मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय तुम्हाला कामाच्या ठिकाणी फायदे मिळतील. स्वतःचा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो. कामाच्या ठिकाणाबाबत बोलायचं झालं तर तुमचं काम पाहून वरिष्ठ अधिकारी खुश होणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )