Todays Panchang : हिंदू धर्मात कुठलही शुभ कार्य करताना गणरायाची आराधना केली जाते. आज संकष्ट चतुर्थी म्हणजे चैत्र महिन्यातील चतुर्थी. शनिदेव आणि विघ्नहर्ता यांचा आशिवार्द मिळण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आजची संकष्ट चतुर्थी (Sanksha Chaturthi) चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आज संकष्टीच्या मुहूर्तावर सर्वार्थ सिद्धी योग तयार होतो आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप शुभ आहे. अशा या शुभ दिनी पाहा आजच पंचांग, यामधून तुम्हाला शुभ मुहूर्त,चंद्रोदय, सूर्योदय, योग, तिथी सगळ्याची महिती मिळेल. (11 march 2023 Saturday todays panchang Sanksha Chaturthi mahurat tithi nakshatra astro news in marathi)
हिंदू पंचांगातील प्रत्येक महिना आणि दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. आज चैत्र महिन्यातील चतुर्थी तिथी असून पंचांगानुसार दिवसात अनेक शुभ मुहूर्त असतील. येथे संपूर्ण पंचांग वाचा.
आजचा वार - शनिवार
तिथी- चतुर्थी
नक्षत्र - चित्रा
योग - ध्रुव
करण- बव बालव
चतुर्थी - रात्री 10:05 पर्यंत
सूर्योदय वेळ : सकाळी 06:36 वाजता
सूर्यास्त वेळ : संध्याकाळी 06:27 वाजता
चंद्रोदय वेळ : संध्याकाळी 10:03 वाजता
चंद्रास्त वेळ : सकाळी 08:39 वाजता
अभिजित मुहूर्त - दुपारी 12:08 ते दुपारी 12:55 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02:30 ते दुपारी 03:17 पर्यंत
राहुकाल - सकाळी 9 ते रात्री 10:30 पर्यंत
गुलिक काल - सकाळी 6 वाजेपासून 7:30 पर्यंत
आनन्दादि योग
सिद्धि
सूर्य कुंभ राशीत
चंद्र तूळ राशीतून भ्रमण करेल
सर्वार्थसिद्धी योग - सकाळी 07:11 पासून- 12 मार्च सकाळी 06:42 वाजेपर्यंत
ताराबल - भरणी, रोहिणी, आद्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वा फाल्गुनी, हस्त, स्वाती, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वसाधा, श्रवण, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा आणि रेवती
चंद्रबल- मेष, वृषभ, सिंह, तूळ, धनु आणि मकर
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)