1/11
नाईन अवर्स टू रामा (१९६३)
हा सिनेमा पूर्णपणे कल्पनाविलास होता. या सिनेमात गांधींना मारण्यापूर्वीचे नऊ तास दाखवण्यात आले. या नऊ तासांत नथुराम गोडसेने काय केलं, हे चित्रित करण्यात आलं आहे. मुस्लिमांची हत्या आणि त्यांना होणारा त्रास या सिनेमात दाखवला. जे एस कश्यप या अभिनेत्याने गांधींची भूमिका साकारली तर होर्स्ट बहुशोल्झ या अभिनेत्याने नथुराम गोडसेंची भूमिका साकारली.
2/11
3/11
गांधी (१९८२)
बेन किंग्लजे या अभिनेत्याने साकारलेले गांधी आत्तापर्यंतचे सर्वांत खरे गांधी मानले जाऊ लागले. गांधींचा अहिंसेचा लढा, असहकार आंदोलन, चले जाव आंदोलन, जालियनवाला बाग हत्याकांड, फाळणी या सर्व घटना अतिशय वास्तववादी पद्धतीने दाखवल्या होत्या. हा सिनेमा गांधींवरील बनवलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व सिनेमांतील सर्वांत वरचा सिनेमा मानला जातो.
4/11
5/11
द मेकिंग ऑफ महात्मा (१९९६)
ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या सिनेमातून महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील सुरूवातीच्या काळावर हा सिनेमा बेतला आहे. महगात्मा बनण्यापूर्वी गांधी कसे होते, याचं दर्शन या सिनेमात घडलं. रजित कपूर या अभिनेत्याने या सिनेमात तरुण गांधींची भूमिका केली होती. या सिनेमाबद्दल रजित कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं होतं. हा सिनेमा फातिमा मीर यांच्या पुस्तकावर आधारित होता.
6/11
गांधी, माय फादर (२००७)
अनिल कपूर निर्मित ‘गांधी, माय फादर’ या सिनेमात गांधी आणि त्यांचा मुलगा हरिलाल यांचं नातं उलगडण्यात आलं होतं. दर्शन जरिवाला या अभिनेत्याने गांधींची भूमिका केली होती. तर अक्षय खन्नाने हरिलाल गांधींची भूमिका केली. पिता-पुत्रांच्या मतभेदावर हा सिनेमा आधारलेला होता. वडिलांच्या महानतेपुढे आपल्या झाकोळल्या गेलेल्या अस्तित्वाच्या शोधातील मुलाची भूमिका अक्षय खन्नाने केली होती.
7/11
हे राम (२०००)
या सिनेमाचा गाभा फाळणी आणि त्या अनु,गाने घडलेली गांधींची हत्या असा होता. नसिरूद्दीन शाह यांनी या सिनेमात गांधींची भूमिका केली होती. दक्षिणेतील लोकप्रिय आणि प्रतिभाशाली अभिनेता कमल हासन यांनी या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय केला होता. कमल हासन यांनी या सिनेमात हिंदूत्ववादी साकेतरामची भूमिका साकारली होती. फाळणीसाठी गांधींना जबाबदार धरून गांधींची हत्या करण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचतो. मात्र तत्कालीन वातावरण आणि गांधींचे खरे विचार त्याला जाणवू लागल्यावर त्याच्या मनात द्वंद्व सुरू होतं आणि गांधींची माफी मागण्यासाठी साकेतराम त्यांच्यासमोर हजर होतो. मात्र त्याचवेळी नथुराम गांधींची हत्या करतो. विलक्षण ताकदीचं कथानक असलेला हा सिनेमा भारतात फारसा चालला नाही. मात्र या सिनेमाची ऑस्कर एंट्री करण्यात आली होती..
8/11
लगे रहो मुन्नाभाई (२००६)
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सिनेमाच्या यशानंतर याच सिनेमातील मंडळींनी एकत्र येऊन केलेली निर्मिती म्हणजे लगे रहो मुन्नाभाई. या सिनेमातून गांधीवादाचं रूपांतर गांधीगिरीमध्ये करण्यात आलं. ही गांधीगिरी तुफान लोकप्रिय झाली. गुंड असणाऱ्या मुन्नाभाईला (संजय दत्त) गांधी दिसू लागतात आणि त्यातून त्याच्यात होणारं परिवर्तन हा सिनेमाचं कथानक होतं. दिग्गज मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी केलेली गांधींची भूमिका ही पारंपरिक गांधींच्या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी होती. या सिनेमातील गांधीगिरीचा समाजावर खूप मोठा परिणाम घडून आला. अनेक ठिकाणी गांधीवादाचा वापर करत अहिंसेच्या मार्गाने निदर्शन होऊ लागली. परदेशातही हा सिनेमा गाजला आणि गांधींची शिकवण नव्याने लोकांना अनुभवायला मिळाली.
9/11
मैने गांधी को नही मारा (२००५)
दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी हिंदी विषय शिकवणाऱ्या निवृत्त प्राध्यापकांची भूमिका साकारली होती. आभासी जगात वावरणाऱ्या या प्राध्यापकांना आपणच गांधींची हत्या केली असल्याचा समज झालेला असतो. हा समज होण्यामागे त्यांच्या बालपणी घडलेल्या एका घटनेचा कसा संबंध असतो, हे त्यांचे बंधू त्यांच्या मुलीला (उर्मिला मातोंडकर) सांगतात. यानंतर त्यांची मुलं त्यांच्यावर उपचार करतात, अशी या सिनेमाची कथा होती.
10/11
11/11