युवराज सिंगच्या माहीत नसेलल्या गोष्टी

Dec 12, 2013, 20:04 PM IST
1/6

व्हिडिओ गेमचा चाहतायुवराजला लहानपणापासून व्हिडिओ गेम्स खेळण्याचे भरपूर वेड होते आणि आजही आहे. कॅन्सरवरील उपचारा दरम्यान, केमोथेरपीनंतर तब्बल १० दिवस त्याला चालता येत नव्हते. मैदानात चित्त्याच्या चपळाईने पळणाऱ्या युवराजला `व्हिलचेअर`वर चालताना अश्रू अनावर झाले होते. हे वडिलांनी पाहताच त्यांचा धीर खचू नये म्हणून, युवीने तुम्ही मला व्हिडिओ गेम पण खेळू देत नाही. यासाठी मी रडतोय असे कारण सांगितले. मला माझा व्हिडिओ गेम आणून द्या असा हट्ट युवीने केला होता.

व्हिडिओ गेमचा चाहता
युवराजला लहानपणापासून व्हिडिओ गेम्स खेळण्याचे भरपूर वेड होते आणि आजही आहे. कॅन्सरवरील उपचारा दरम्यान, केमोथेरपीनंतर तब्बल १० दिवस त्याला चालता येत नव्हते. मैदानात चित्त्याच्या चपळाईने पळणाऱ्या युवराजला `व्हिलचेअर`वर चालताना अश्रू अनावर झाले होते. हे वडिलांनी पाहताच त्यांचा धीर खचू नये म्हणून, युवीने तुम्ही मला व्हिडिओ गेम पण खेळू देत नाही. यासाठी मी रडतोय असे कारण सांगितले. मला माझा व्हिडिओ गेम आणून द्या असा हट्ट युवीने केला होता.

2/6

विश्वचषक विजेता सदस्य युवी१४ जानेवारी २०११ला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जोहान्सबर्गच्या सामन्याच्या सकाळीच युवराजला कफ झाल्याचे जाणवले. त्या वेळी त्याची एक बाजू पूर्ण निकामी झाल्याचे वाटले होते. युवीच्या मनात तेव्हाच शंका आली होती. परंतु, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकात खेळण्यासाठी त्याने कोणतीही वैद्यकीय चाचणी त्यावेळी करून घेतली नाही. विश्वचषक जिंकल्यानंतर युवीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले आणि दुसऱया दिवशी त्याने वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या.

विश्वचषक विजेता सदस्य युवी
१४ जानेवारी २०११ला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जोहान्सबर्गच्या सामन्याच्या सकाळीच युवराजला कफ झाल्याचे जाणवले. त्या वेळी त्याची एक बाजू पूर्ण निकामी झाल्याचे वाटले होते. युवीच्या मनात तेव्हाच शंका आली होती. परंतु, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकात खेळण्यासाठी त्याने कोणतीही वैद्यकीय चाचणी त्यावेळी करून घेतली नाही. विश्वचषक जिंकल्यानंतर युवीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले आणि दुसऱया दिवशी त्याने वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या.

3/6

अभिनेता युवीलहानपणी खेळाबरोबर अभिनयातही युवीच्या आपली ओळख निर्माण केली होती . `मेहंदी सजादी` या पंजाबी मालिकेही लहान असताना युवराजने काही काळाकरिता अभिनय केला होता.

अभिनेता युवी
लहानपणी खेळाबरोबर अभिनयातही युवीच्या आपली ओळख निर्माण केली होती . `मेहंदी सजादी` या पंजाबी मालिकेही लहान असताना युवराजने काही काळाकरिता अभिनय केला होता.

4/6

ममाज् बॉय युवीयुवराज लहान असताना काही कौटुंबिक कारणास्तव युवीच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचे ठरविले. घटस्फोटानंतर युवराजने आपल्या आईकडे राहण्याचे ठरविले होते.

ममाज् बॉय युवी
युवराज लहान असताना काही कौटुंबिक कारणास्तव युवीच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचे ठरविले. घटस्फोटानंतर युवराजने आपल्या आईकडे राहण्याचे ठरविले होते.

5/6

प्रेम क्रिकेट नाही तर टेनिस आणि स्केटिंगक्रिकेटमध्ये सिक्सर किंग म्हणून नाव लौकिक मिळवलेल्या युवराजला लहानपणी क्रिकेट आवडतच नव्हते. युवीला लहानपणी टेनिस आणि स्केटिंगची आवड होती. इतकेच नाही, युवीने १४ वर्षाखालील राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे अंजिक्यपदही पटाकावले होते. टेनिस आणि स्केटिंगमध्ये युवी निपुण खेळाडू होता. केवळ वडिल योगराज सिंह यांच्या हट्टपायी युवराज क्रिकेटपटू व्हायला लागले. क्रिकेटपटू होण्याचे संपूर्ण श्रेय तो आपल्या वडिलांना देतो.

प्रेम क्रिकेट नाही तर टेनिस आणि स्केटिंग
क्रिकेटमध्ये सिक्सर किंग म्हणून नाव लौकिक मिळवलेल्या युवराजला लहानपणी क्रिकेट आवडतच नव्हते. युवीला लहानपणी टेनिस आणि स्केटिंगची आवड होती. इतकेच नाही, युवीने १४ वर्षाखालील राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे अंजिक्यपदही पटाकावले होते. टेनिस आणि स्केटिंगमध्ये युवी निपुण खेळाडू होता. केवळ वडिल योगराज सिंह यांच्या हट्टपायी युवराज क्रिकेटपटू व्हायला लागले. क्रिकेटपटू होण्याचे संपूर्ण श्रेय तो आपल्या वडिलांना देतो.

6/6

युवराजचा आज वाढदिवस....टीम इंडियाचा २०११ विश्वचषकातला सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळविणारा `युवी` आज ३२ वर्षांचा झाला. कर्करोगावर मात करत पुन्हा टीम इंडियात पुनरागमन केलेल्या युवराज विषयी जे तुम्हांला माहित नाही असे....

युवराजचा आज वाढदिवस....
टीम इंडियाचा २०११ विश्वचषकातला सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळविणारा `युवी` आज ३२ वर्षांचा झाला. कर्करोगावर मात करत पुन्हा टीम इंडियात पुनरागमन केलेल्या युवराज विषयी जे तुम्हांला माहित नाही असे....