मुंबई : शुक्रवारी आलेली महाशिवरात्र, त्यातच शनिवार आणि रविवारी असणारी सुट्टी अशा सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या उदभवली आहे. मुंबई पुणे एक्स्र्पेस वेवर शुक्रवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
महत्त्वाची बातमी | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी. खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा #मुंबईपुणे #मुंबई #पुणे https://t.co/HOK58cBO5u
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 21, 2020
लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे या मार्गावरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे पुण्याच्या दिशेने प्रवास करत असल्याच या वाहतूक कोंडीमध्ये दवडला जाणारा वेळ ध्यानात घेण्याला काही प्रवासी प्राधान्य देत आहेत.
पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरी वाहतुकीची गती पाहता, या मार्गावरुन प्रवास करणं टाळण्याचा पर्याय तूर्तास काहींनी निवडला आहे. बुधवारी आलेली शिवजयंतीची सुट्टी, त्यानंतरचा एक गुरुवार वगळता शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तिनही दिवशी शाळा, महाविद्यालयं आणि बहुतांश कार्यालयांना रजा असल्यामुळे अनेकांनीच दैनंदिन जीवनाच्या धकाधकीपासून दूर जात छोटेखानी सहलींवर जाण्याला प्राधान्य दिलं.
मुंबईकरांनीही नजीकच्या काही स्थळांना प्राधान्य दिलं. परिणामी, पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाटेवर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.