World Osteoporosis Day 2023 : हाडे लोखंडासारखे टणक करतील 'हे' पदार्थ, हेल्दी बोन्सकरता फॉलो करा डाएट

World Osteoporosis Day 2023 : शरीराच्या संपूर्ण विकासाकरता हाडे मजबूत असणे अत्यंत गरजेचे असते. आपले खाणेपिणे ते अगदी काही विशिष्ट सवयी हाडांना कमकुवत करतात. ज्यामुळे भविष्यात ऑस्टियोपोरोसिसचे कारण ठरू शकते. अशावेळी या आजारापासून बचाव करण्यासाठी या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा. 

Food For Good Bones :  निरोगी आयुष्यासाठी हाडे मजबूत असणे गरजेचे असते. याकरता तुमचा आहार आणि सवयींकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तुमचा आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. मजबूत हाडांसाठी शरीराचा संपूर्ण विकास देखील व्यवस्थित होणे तेवढे गरजेचे असते. पण अनेक कारणांमुळे हाडे कमकुवत होतात. ज्यामुळे भविष्यात ऑस्टियोपोरोसिसचे कारण होऊ शकते. Healthline च्या रिपोर्टनुसार, या 7 पदार्थांचा हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समावेश करा. 

ऑस्टियोपोरोसिस हाडांशी संबंधित एक समस्या आहे. ज्यामध्ये हाडांची घनता कमी होते. ज्यामुळे हाडे कमकुवत होतात त्यामध्ये कोणतीच ताकद राहत नाही. याच उद्देशाने 20 ऑक्टोबर जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिवस साजरा केला जातो. 

1/7

एडामे

World Osteoporosis Day 2023 Know 7 Foods make strong bones and prevent osteoporosis

जर तुम्हाला देखील हाडे मजबूत करायचे असतील तर मॅग्नेशियम, प्रोटीन आणि पोटॅशियमने पोषक असतील तर वाटाण्यासारखे दिसणारे एडामे खा. हाडांची मिनरल डेंसिटी उत्तम ठेवण्यासाठी या पदार्थाचा समावेश होतो.   

2/7

पालक

World Osteoporosis Day 2023 Know 7 Foods make strong bones and prevent osteoporosis

लोहयुक्त असलेले पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील भरपूर असतात. जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. एवढंच नव्हे तर फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासही या पालकाचे महत्त्व अधिक आहे. 

3/7

दूध

World Osteoporosis Day 2023 Know 7 Foods make strong bones and prevent osteoporosis

आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकले असेल की मजबूत हाडांसाठी दूध खूप महत्वाचे आहे. हेच कारण आहे की, तज्ज्ञ देखील लहानपणापासून दूध पिण्याची शिफारस करतात. हे कॅल्शियम, प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्त्वे समृध्द आहे, जे हाडांचे आरोग्य सुधारण्यास आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित रोग टाळण्यास मदत करते.  

4/7

चीज

World Osteoporosis Day 2023 Know 7 Foods make strong bones and prevent osteoporosis

चीजमध्ये भरपूर कॅल्शियम आणि कॅलरीज असतात. जे हाडे मजबूत करण्यास खूप मदत करतात. याशिवाय यामध्ये असलेले प्रोटीन, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए हे देखील आरोग्याला फायदेशीर ठरते.

5/7

अंजीर

World Osteoporosis Day 2023 Know 7 Foods make strong bones and prevent osteoporosis

कॅल्शियम, व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशियम समृद्ध अंजीर हाडे मजबूत करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. दररोज अंजिर भिजवून खाल्ल्याने नक्कीच फायदा होतो. 

6/7

टोफू

World Osteoporosis Day 2023 Know 7 Foods make strong bones and prevent osteoporosis

हेल्दी आणि स्ट्राँग बोन्सकरता टोफू हा पदार्थ चांगला असतो. कारण यामध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. तसेच मुले आणि महिलांकरता कॅल्शियमची आवश्यकता असते. याकरता टोफू खाणे फायदेशीर ठरते. 

7/7

मासे

World Osteoporosis Day 2023 Know 7 Foods make strong bones and prevent osteoporosis

जे मांसाहार खातात त्यांना प्रथिने चांगल्या प्रमाणात मिळतात. पण, जे लोक शाकाहारी आहार घेतात त्यांना अनेकदा पुरेसे प्रोटीन मिळत नाही. अशा परिस्थितीत टोफू हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण, त्यात प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. शिवाय, 100 ग्रॅम टोफूमध्ये सुमारे 10 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे 40-44 कॅलरी ऊर्जा मिळते.