जगभरातील प्रसिद्ध तांदूळ; आहारात समावेश केल्यास मिळतील आरोग्यदायी फायदे

जगभरात 40 हजारपेक्षा जास्त तांदळाच्या जाती असल्या तरी काही प्रजातींना सर्वात जास्त पसंती दिली जाते. 

Aug 05, 2024, 17:29 PM IST
1/9

कोकणात प्रामुख्याने भातशेती केली. आषाढ संपताच आणि श्रावण सुरु होताना लावणी केली जाते. देशात बासमती, इंद्रायणी आणि कोलम या जातीच्या तांदळाला जास्त पसंती दिली जाते. फक्त भारतातच नाही तर  जगभरात अनेकांना भात खायला आवडतो. 

2/9

जगभरात भाताच्या एकूण 40 हजार पेक्षा जास्त जाती आहे. आशिया खंडातील बहुतांश देशात तांदळाचं पीक घेतलं जातं. आशियाई तांदूळ, आफ्रिकन तांदूळ, जंगली तांदूळ,कॅलिफोर्निया,कॅनेडियन,ऑस्ट्रेलियन  अशा जगभरात तांदळाच्या वेगवेगळ्या जाती आहे. 

3/9

तांदळाच्या वेगवेगळ्या जातीला वाण असंही म्हटलं जातं. जगभरात 40 हजारपेक्षा जास्त तांदळाच्या जाती असल्या तरी काही प्रजातींना सर्वात जास्त पसंती दिली जाते. 

4/9

बांबू तांदूळ

हा तांदूळ हिरव्या रंगाचा दिसतो. बांबूच्या झाडाजवळ याची लागवड केली जाते त्यामुळे त्याला निसर्गत: हिरवा रंग असतो. यात व्हिटामीन बी 3 आणि लिकोनिक अ‍ॅसिड सारखे पोषक घटक असल्याने मेधुमेह सहसा होत नाही. या भाताच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. 

5/9

मोगरा तांदूळ

हा बासमती तांदळाचा एक प्रकार आहे. भारत आणि पाकिस्तानात प्रामुख्याने याचं पीक घेतलं जातं. यात व्हिटामीन बी असल्याने हाडांना  बळकटी मिळते. यात झिंकची मात्रा जास्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.   

6/9

तपकिरी तांदूळ

तपकिरी रंगाच्या तांदळाचं पीक हे हिमाचल प्रदेशात प्रामुख्याने घेतलं जातं. तपकिरी रंगाच्या तांदळात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही या तांदळाचा आहारात समावेश करु शकता. 

7/9

काळा तांदूळ

खास करुन आशिया खंडातील देशात चीन, कोरिया, जपान, थायलंड, फिलीपिन्स आणि भारतात याचं पीक घेतलं जातं.  काळ्या रंगाच्या तांदळामध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई आणि लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हृदय आणि यकृताचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.   

8/9

सोना मसुरी

दाक्षिणात्य भागात खास करुन तामिळनाडूमध्ये  या तांदळाचं पीक घेतलं जातं. भारतात हा तांदळाला मोठ्या  प्रमाणात पसंती दिली जाते. या भाताच्या सेवनाने रक्तातील लोहाचं प्रमाण वाढतं. शरीरातील पेशींची संख्या वाढण्यासाठी सोना मसुरी फायदेशीर आहे.   

9/9

जंगली तांदूळ

या तांदळामुळे आतड्यांचं आरोग्य निरोगी राहतं. हृदयविकाराच्या आजारावर या भाताचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. या भाताचं पीक कॅनडामध्ये घेतलं जातं. हा काहीसा काळपट चॉकलेटी रंगाचा दिसतो.