जगातील सर्वात हॉरर सिनेमा, घरी एकट्याने अजिबात पाहू नका! सत्य घटनेवर असल्याचा मेकर्सचा दावा

हा संपूर्ण चित्रपट कोणी पाहत नाही, प्रेक्षक मध्येच टीव्ही बंद करतात, असे म्हटले जाते. कोणता आहे सिनेमा? जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Sep 25, 2024, 14:30 PM IST

Best Horror Film on OTT: हा संपूर्ण चित्रपट कोणी पाहत नाही, प्रेक्षक मध्येच टीव्ही बंद करतात, असे म्हटले जाते. कोणता आहे सिनेमा? जाणून घेऊया.

1/10

जगातील सर्वात हॉरर सिनेमा, घरी एकट्याने अजिबात पाहू नका! सत्य घटनेवर असल्याचा दावा

World Best Horror Film Conjuring scariest movie Marathi News

Best Horror Film on OTT: सिनेमा हे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बनवलेले असतात. पण हॉरर सिनेमातून प्रेक्षकांना मनोरंजनासोबत भीतीचा सामनाही करावा लागतो. आतापर्यंत तुम्ही अनेक हॉरर सिनेमा पाहिले असाल. काहीजण एकट्याने तर काहीजण ग्रुपने हॉरर सिनेमा पाहत त्याचा आनंद घेतात. पण असा एक सिनेमा आहे, जो एकट्याने पाहण्याची हिंमत कोणी करत नाही.

2/10

हॉरर सिनेमांमध्ये टॉपला

World Best Horror Film Conjuring scariest movie Marathi News

जगातील हॉरर सिनेमांमध्ये टॉपला या सिनेमाचे नाव घेतले जाते.या सिनेमाचे आतापर्यंत तीन सिक्वेल बनवले गेले आहेत आणि चौथ्यासाठी तयारी सुरू आहे.

3/10

प्रेक्षक मध्येच टीव्ही बंद करतात

World Best Horror Film Conjuring scariest movie Marathi News

या चित्रपटाला जगभरात इतके प्रेम मिळाले आहे की लोक अजूनही तो ओटीटीवर मोठ्या प्रमाणावर पाहतात. हा संपूर्ण चित्रपट कोणी पाहत नाही, प्रेक्षक मध्येच टीव्ही बंद करतात, असे म्हटले जाते. कोणता आहे सिनेमा? जाणून घेऊया. 

4/10

3 सिक्वेल रिलीज

World Best Horror Film Conjuring scariest movie Marathi News

2013 मध्ये रिलीज झालेला 'द कॉन्ज्युरिंग' या हॉरर चित्रपटाबद्दल आपण बोलतोय. जेम्स वॅन दिग्दर्शित एक अलौकिक भयपट चित्रपटाची जगभरात चर्चा आहे. आतापर्यंत याचे 3 सिक्वेल रिलीज झाले आहेत आणि ते सर्व हिट झाले आहेत. 

5/10

भूतांशी संबंधित अनेक सत्य घटना?

World Best Horror Film Conjuring scariest movie Marathi News

द कॉन्ज्युरिंग युनिव्हर्स फ्रँचायझीचा पहिला चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला ज्यामध्ये पॅट्रिक विल्सनने मुख्य भूमिका केली होती.'द एमिटी विले हॉरर' नावाच्या पुस्तकापासून हा चित्रपट प्रेरित आहे. या पुस्तकात भूतांशी संबंधित अनेक सत्य घटना असल्याचा दावा करण्यात आला आहे.

6/10

काय आहे कहाणी?

World Best Horror Film Conjuring scariest movie Marathi News

लॉरेन वॉरन आणि एड वॉरन नावाचे एक जोडपे होते, जे पॅरानॉर्मल घटनांपासून मुक्ती देण्याचे काम करतात. ॲडने 2006 मध्ये आणि लॉरेन्सने 2019 मध्ये या जगाचा निरोप घेतला. ते दोघेही भूत आणि आत्म्याशी संबंधित बाबींचे जाणकार होते. या कहाणीवर घेऊन 'द कॉन्ज्युरिंग' बनवण्यात आला आहे.

7/10

वाळलेल्या झाडामध्ये अॅक्टीव्हीटी

World Best Horror Film Conjuring scariest movie Marathi News

चित्रपटाची सुरुवात एका मोठ्या घरापासून होते. जिथे हसत खेळत कुटुंब राहतं. पण तलावात आणि बागेच्या परिसरात वाळलेल्या झाडामध्ये काही पॅरानॉर्मल अॅक्टीव्हीटी दिसून येतात तेव्हा एकच खळबळ उडते.

8/10

मुक्ती कशी मिळवायची?

World Best Horror Film Conjuring scariest movie Marathi News

कुटुंब एड आणि लॉरेनला कॉल करते. तो घराचा प्रत्येक कोपरा तपासतो. आता घरातील भुताटकीच्या घटनांपासून मुक्ती कशी मिळवायची? हे चित्रपटात पाहायला मिळेल.

9/10

सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा

World Best Horror Film Conjuring scariest movie Marathi News

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटाच्या शेवटी, काही वृत्तपत्रातील बातम्या दाखवल्या जातात ज्यावरून असे सिद्ध होते की काही पॅरानॉर्मल घटना घडत होत्या. आता ही कथा लोकांना इतकी आवडली की 'द कॉन्ज्युरिंग'ने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. आता तुम्ही हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

10/10

2025 मध्ये चौथा पार्ट

World Best Horror Film Conjuring scariest movie Marathi News

2013 मध्ये रिलीज झालेल्या 'द कॉन्ज्युरिंग'चे बजेट $20 दशलक्ष होते तर त्याची कमाई $319.5 दशलक्ष (रु. 2,668 कोटी) होती. यानंतर निर्मात्यांनी आणखी तीन सिक्वेल बनवले आहेत. आता प्रेक्षकांच्या नजरा त्याच्या चौथ्या भागाकडे लागल्या आहेत जो 2025 मध्ये येऊ शकतो. 'द कॉन्ज्युरिंग: द लास्ट राइट्स' असे या सिक्वेलचे नाव असेल.