पैसे कमावण्यासाठी डर्टी चित्रपटात काम, विवाहित क्रिकेटरशी लग्न न करताच दिला मुलीला जन्म; आज आहे कोटाधीश

Neena Gupta Birthday Special : आपल्या दमदार अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे कायम ही अभिनेत्री चर्चेत असते. एका विवाहित क्रिकेटरच्या प्रेमात वेडी झाली. गर्भवती झाल्यानंतर क्रिकेटरने लग्नास नकार दिला. तरीही तिने बाळाला जन्म दिला. 

नेहा चौधरी | Jul 04, 2024, 10:57 AM IST
1/7

आज फिल्म इंडस्ट्रीतील या अभिनेत्रीला कोण ओळखत नाही असं कोणीच नाही. या अभिनेत्रीने आता तिच्या बॉलिवूडमधील दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली असून तिच्या चमकदार अभिनयाने आज तिच्याकडे भरपूर काम आहे. 

2/7

एकेकाळी पैसे कमावण्यासाठी तिला डर्टी चित्रपटात काम करावं लागलं होतं. पण आज ती मालामाल आहे. आम्ही बोलत आहोत. 'बधाई हो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिची दुसरी इनिंग सुरू करणाऱ्या नीना गुप्ता हिच्याविषयी.

3/7

नीना गुप्ता हिचा आज वाढदिवस असून ती 65 वर्षांची झालीय. आज ती ज्या शिखरावर पोहोचली आहे त्यासाठी तिला अनेक चढ उताराचा सामना करावा लागला होता. 

4/7

नीना गुप्ता तिच्या अभिनयासोबत तिच्या बोल्डनेस आणि तिच्या प्रखर मतांमुळे ती कायम चर्चेत असते. एवढंच नाही तर तिने मांडल्यानंतर मत ती कधीही मागे घेत नाहीत. 

5/7

चित्रपटासोबत तिने टेलिव्हिजनवरही अनेक मालिकेत काम केलं असून चाहत्यांनी पसंती दिलीय. खानदान', 'सास' आणि 'सिसकी' या सारख्या मालिका गाजल्या आहेत. 

6/7

नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यातील नात्याबद्दल सर्व जगाला माहितीय. विवाहित क्रिकेटच्या प्रेमात पडली. ती गरोदर असताना रिचर्ड्सने लग्नाला नकार दिला. त्यानंतरही तिने मसाबाला जन्म दिला.  

7/7

व्हीव रिटर्ड्स आणि नीना गुप्ता यांची पहिली भेट ही जयपूरमध्ये विनोद खन्नासोबत एका चित्रपटासाठी शूटिंग दरम्यान झाली. जयपूरच्या महाराणींनी चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांना जेवणासाठी आमंत्रित दिले होते. त्यावेळी वेस्ट इंडिज संघाचे खेळाडूही तिथे उपस्थित होते. तिथे त्यांची ओळख झाली, मग मैत्री आणि मग ते रिलेशनशीपमध्ये आलेत.