PUBG खेळणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली महिला, पतीकडे घटस्फोटाची मागणी

shailesh musale | May 18, 2019, 14:29 PM IST
1/6

ऑनलाइन मोबाईल गेम पबजी (PUBG)संबधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण गुजरातमधील आहे. एका मुलाच्या आईला तिचा पबजी खेळणारा पार्टनर इतका आवडला की तिने पतीकडे घटस्फोट मागितला आहे.

2/6

गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणारी १९ वर्षाच्या या महिलेने व्युमन हेल्पलाईनकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. अधिकाऱ्याने माहिती दिली की, ही महिला एका प्रतिष्ठित परिवारातील आहे.

3/6

महिलेने व्युमन हेल्पलाईनवर म्हटलं की, या महिलेचं वयाच्या १८ व्या वर्षी एका बिल्डरसोबत विवाह झाला होता. तिला एका मुलगी देखील आहे.

4/6

या महिलेला पबजी खेळण्याची सवय लागली. ती दिवसभर हा गेम खेळत असते. गेम खेळत असताना ती एका युवकाच्या संपर्कात आली. जो रोज पबजी खेळतो आणि त्याची रँकींग देखील चांगली आहे.

5/6

महिला हेल्पलाईन काऊंसिलर सोनल सागठिया यांनी म्हटलं की, ही महिला या मुलासोबत रोज चॅट करते. त्यामुळे तिचा पतीसोबत वाद झाला. त्यानंतर ही महिला माहेरी निघून आली. आता या महिलेचं म्हणणं आहे की, तिला या मुलासोबत राहायचं आहे. कारण तो खूप छान पबजी खेळतो.

6/6

पतीकडे घटस्फोट मागणाऱ्या महिलेच्या वडिलांनी या गोष्टीला विरोध केला आहे. काऊंसिलरने महिलेला यावर पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच पबजी गेमचं व्यसन लागल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.