मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात? पतंगबाजी करणाऱ्यांनाही माहित नसेल उत्तर

Makar Sankranti 2025 : 14 जानेवारी रोजी भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे आणि मनसोप्त  पतंग उडवण्याचा आनंद घेतात.  मकर संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वीपासून लहान मुलं पतंग उडवताना दिसतात, तर मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाश पतंगांनी भरून जातं. परंतु मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात ही परंपरा कधीपासून सुरु झाली याविषयी खूप कमी जणांना ठाऊक असते. 

| Jan 08, 2025, 16:27 PM IST
1/7

मकर संक्रांती हा सण पौष महिन्यातील शेवटचा सण असून यानंतर थंडी कमी होतं जाते. सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांती असे म्हणतात. यंदा मंगळवार 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. 

2/7

मकर संक्रांतीला लोक आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवताना दिसतात, पण तुम्ही कधी विचार केलाय का? की मकर संक्रांत आणि पतंग उडवण्याचा संबंध काय?   

3/7

खुल्या छतावर दिवसभर पतंग उडवल्याने शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. शरीर बराचकाळ सूर्यप्रकाशात राहिल्याने त्याचा शरीराला फायदा होतो आणि ही सूर्यकिरणं माणसाच्या शरीरासाठी औषधाप्रमाणे काम करतात. सूर्याच्या किरणांमधून व्हिटॅमिन डी मिळतो. 

4/7

त्रेतायुगात मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभू श्री रामाने आपली भावंडं आणि हनुमानासह पतंग उडवले होते. तेव्हापासून मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरु झाली. 

5/7

असं म्हटलं जातं की भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग हा थेट स्वर्गात पोहोचला होता. हा पतंग  इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला सापडला, तिने हा पतंग स्वतःजवळ ठेवला. त्यानंतर हनुमान  जेव्हा तो पतंग परत आणण्यासाठी गेले तेव्हा हा पतंग मी तेव्हाच देईन जेव्हा श्री राम स्वतः मला दर्शन द्यायला येतील. तेव्हा हा निरोप घेऊन हनुमान श्री रामांकडे आले. तेव्हा श्री राम म्हणाले की, ती मला चित्रकूटमध्ये पाहू शकेल आणि हनुमानाला पुन्हा हा आदेश देण्यासाठी पाठविले. प्रभू रामांकडून आलेला आदेश ऐकून जयंतच्या पत्नीने तो पतंग परत केला. 

6/7

2025  मध्ये मकरसंक्रांतीचा सण हा 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणार असून सकाळी 09.03 ते संध्याकाळी 05.46 वाजेपर्यंत पुण्यकाळ असेल.   

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)