पुणेकरांना हेल्मेट सक्ती लागू का होत नाही? 6 ठळक कारणे!

पुणेकरांना हेल्मेट सक्ती का केली जात नाही? यावर पुणेकरांचं म्हणणं जाणून घेऊया. 

| Nov 29, 2024, 14:52 PM IST

Pune Helmet: पुणेकरांना हेल्मेट सक्ती का केली जात नाही? यावर पुणेकरांचं म्हणणं जाणून घेऊया. 

1/13

पुणेकरांना हेल्मेट सक्ती लागू का होत नाही? 6 ठळक कारणे!

Pune helmet not mandatory Punekars Reaction 6 prominent reasons

Pune Helmet Not Mandatory: पुणे हे एक देशी मराठी संस्कृती आणि आचार-विचारांचे शहर आहे. ज्यामध्ये शिक्षण, कला आणि हस्तकला आणि थिएटर यांना योग्य महत्त्व दिले जाते.तसेच ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणूनही पुणे ओळखले जाते.

2/13

हेल्मेट सक्तीचा विषय वेळोवेळी चर्चेत

'भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर' म्हणून अनेक वेळा पुण्याला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. याचा परिणाम मुलभूत सुविधा तसेच ट्रॅफीकवरही होतोय. या सर्व गंभीर प्रश्नांसोबत पुण्यात हेल्मेट सक्तीचा विषय वेळोवेळी चर्चेत येतो. पुणेकरांना हेल्मेट सक्तीतून सूट का दिली जाते? याबद्दल जाणून घेऊया.

3/13

नागरिकांमध्ये होती संभ्रमावस्था

पुणे शहरात दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्या सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती. परंतु पुणे पोलिसांकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नसून महामार्गांसाठी वरिष्ठ स्तरावरून आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

4/13

कारवाई केली जाणार नाह

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसून कारवाई केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे. दरम्यान पुणेकरांना हेल्मेट सक्ती का केली जात नाही? यावर पुणेकरांचं म्हणणं जाणून घेऊया.

5/13

वाहतूक नियमाचा एक भाग

हेल्मेट सक्ती वाहतूक नियमाचा एक भाग आहे. जो देशभरात सर्वांना सारखाच आहे. प्रश्न येतो कुठे कशी अंमलबजावणी होते याचा. पुण्यात हेल्मेट सक्तीचा विषय गेल्या 15 वर्षांपासून सुरु आहे. प्रत्येक वेळी नवीन आयुक्त येतो आणि हेल्मेट सक्तीच्या नियमाची अमंलबजावणी करतात.

6/13

पुणेकर काय सांगतात कारणे?

पण जेव्हा हेल्मेट सक्तीची अमंलबजावणी होते तेव्हा पुणेकर एकत्र येऊन याला विरोध करतात. यामागे पुणेकर काही कारणेदेखील सांगतात. ही कारणे समजून घेऊया.

7/13

30 ते 40 वेग

पुण्यात  वाहतुकीचा विषय गंभीर आहे. त्यामुळे 30 ते 40 वेगाच्या पुढे गाडी चालवता येत नाही. अशावेळी हेल्मेटची गरज काय? असे पुणेकर विचारतात.

8/13

छोट्या अंतरासाठी

पुण्यात छोट्या अंतरासाठी सार्वजनिक वाहतुकीचा कमी वापर केला जातो. छोट्या अंतरासाठी आम्ही टू व्हिलरचा वापर करतो, त्यासाठी हेल्मेटची गरज नाही, असे मत पुणेकर व्यक्त करतात. 

9/13

हेल्मेट संभाळायच कसं

हेल्मेट घेऊन प्रवास केल्यास प्रवासानंतर हेल्मेट संभाळायच कसं मोठा प्रश्न असल्याचे मत काही पुणेकर व्यक्त करतात. 

10/13

महापालिका हद्द

महापालिकेच्या हद्दीत तुम्ही हेल्मेट सक्की करु शकत नाहीत, असे पुणेकर सांगतात. 

11/13

मान आणि पाठीच्या मणक्याचे विकार?

हेल्मेट घातल्याने मान आणि पाठीच्या मणक्याचे विकार होतात, असे एका प्रसिद्ध डॉक्टरने सांगितल्याचे पुणेकर सांगतात.

12/13

आधी वाहतूक कोंडी सोडवा

आमच्यावर हेल्मेट सक्तीचा नियम लादण्याापेक्षा तुम्ही वाहतूक कोंडी सोडवा, असा सल्ला पुणेकर देतात.

13/13

अनोख्या पद्धतीने निषेध

पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती तेव्हा पुणेकरांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढला होता. निर्णयाला विरोध म्हणून एकाने हेल्मेटऐवजी डोक्यात पातेलं घालून निषेध नोंदवला होता. तर दुसऱ्याने डोक्याऐवजी गळ्यात हेल्मेट लटकवून निषेध नोंदवला होता.