हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका? तज्ज्ञांनी सांगितलं नेमकं कारण, 5 प्रकारे घ्या काळजी

जगभरात हार्ट अटॅकचा धोका वाढत असून वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत अनेकजण दरवर्षी हार्ट अटॅकचे बळी होतात. हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो त्यामुळे या मोसमात हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांची स्वतःची जास्त काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञ देतात. तेव्हा हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Nov 15, 2024, 17:19 PM IST
1/8

हिवाळ्याच्या दिवसात हृदयात अनेक बदल होत असतात. हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याचं मुख्य कारण म्हणजे तापमानात झालेली घट. वातावरण थंड असल्याने या दिवसात घाम कमी येतो आणि सॉल्ट लॉस सुद्धा कमी होतो. हिवाळ्यात कमी तापमानामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या आकसतात. यामुळे रक्त हळूहळू हृदयापर्यंत पोहोचते. यादिवसात रक्त घट्ट होतं ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. 

2/8

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार थंडीमुळे हृदयाच्या नसा आकुंचतात आणि हृदयाला होणारा रक्तपुरवठा मंदावतो. परिणामी रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. अशा स्थितीत रक्तपुरवठा खंडित होऊन हार्ट अटॅक येतो.

3/8

हिवाळ्यात हार्ट अटॅकची लक्षण कोणती :

 छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास होणे, शरीराला सारखा घाम येणं, चक्कर येणे, मळमळ होणं उलटीसारखं वाटणं, अचानक खूप जास्त थकवा येणं इत्यादी हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्यापूर्वीची लक्षण आहेत.   

4/8

ताण घेऊ नये :

हिवाळ्यात हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी या दिवसात जास्त ताण घेऊ नये. एक्यूट स्ट्रेसमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो तर क्रोनिक स्ट्रेसमुळे हृदयाच्या नसांमध्ये सूज येऊ शकते. नसांना सूज आल्यामुळे रक्त प्रवाह हळू होतो आणि त्याच्या गाठी तयार होतात.

5/8

भरपूर झोप :

 हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं असतं. हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी दिवसातून 7 ते 8 तास झोप घ्यावी. तसेच सलग काम करू नये त्यातून थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्यावा. 

6/8

दररोज 30 मिनिटं व्यायाम :

 हिवाळा हा व्यायाम करण्यासाठी उत्तम ऋतू आहे. तेव्हा हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी दररोज कमीतकमी 30 मिनिटे व्यायाम कराव. मात्र घराबाहेर व्यायाम करणं टाळावं. तुम्ही सायकलिंग, ट्रेडमिल आणि योगा यासारखे व्यायाम करू शकता. 

7/8

सूर्यफुल आणि मोहरीचं तेल :

हिवाळ्याच्या दिवसात आहारात सूर्यफुल आणि मोहरीच्या तेलाचा वापर करा. तसेच जेवणात सॅलेड आणि फळांचा समावेश करा. बाहेरील फार्स्ट फूड टाळून तुम्ही अधिकाधिक पौष्टिक आहार घ्या. 

8/8

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)