Rohit Sharma: बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती कर्णधाराने का चाखली? वर्ल्डकपनंतर अखेर रोहितने दिलं उत्तर!

Rohit Sharma: टी-20 वर्ल्डकप 2024 वर टीम इंडियाने दुसऱ्यांदा नाव कोरलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही कामगिरी केली आहे. 

Surabhi Jagdish | Jul 02, 2024, 12:17 PM IST
1/7

वनडे वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकप भारतात आणलाच. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने वर्ल्डकप जिंकला.

2/7

दरम्यान या वर्ल्डकपनंतर रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये रोहितने बार्बाडोसच्या पीचची माती चाखत तिला प्रणाम केला होता. 

3/7

रोहितने असं का केलं, याचा खुलासा वर्ल्डकपच्या दुसऱ्या दिवशी रोहितनेच केला आहे.

4/7

रोहित म्हणाला, मी वर्ल्डकप जिंकण्याच्या गोष्टींचं वर्णन करूच शकत नाही, कारण त्या गोष्टी स्क्रिप्टेड नव्हत्या. मी त्या क्षणाचा आनंद घेत होतो. 

5/7

मी त्या पीचवर गेलो कारण त्या पीचने मला वर्ल्डकप जिंकवून दिला, असं रोहितचं म्हणणं आहे. 

6/7

रोहित सांगतो, आम्ही त्या पीचवर खेळलो. हे तेच पीच होतं, ज्याने मला विजय मिळवून दिला. त्यामुळे हे पीच आणि ते ग्राऊंड मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे.   

7/7

त्यामुळे मला खेळपट्टीचा लहानसा भाग कायम स्वतःसोबत ठेवायचा होता. त्यामुळे ते क्षण फार महत्त्वाचे होते, असंही रोहित शर्मा म्हटलं आहे.