'मी संजय दत्तसोबत काम करणार नाही', श्रीदेवीने का घेतली होती शपथ? 40 वर्षांत एकाच चित्रपटात दिसले एकत्र

Sanjay Dutt and Sridevi: आज श्रीदेवी आपल्यामध्ये नाही, पण 40 वर्षे तिने बॉलिवूडमध्ये राज्य केलं. तिच्या करिअरमध्ये तिने मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. पण त्यात संजय दत्त अपवाद होता. तिने संजय दत्तसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती. असं नेमकं काय झालं होतं, की श्रीदेवीने संजूबाबा फक्त एकाच चित्रपटात काम केलं.   

May 24, 2024, 11:52 AM IST
1/9

बॉलिवूडची चांदनीही बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीची प्रेरणा होती. आजही तिच्या चित्रपटाची जादू कायम आहे. बॉलिवूडमधील फर्स्ट लेडी सुपरस्टार अशी ओळख तिने 40 वर्षांमध्ये बनवली होती. तिने अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं. पण त्या एका घटनेमुळे तिने संजय दत्तसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती. 

2/9

श्रीदेवीने संजय दत्तसोबत फक्त एकच ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केलं. त्यानंतर तिने कधीच संजय दत्त काम केलं नाही. यामागे कारणीही तसंच होतं. जे माहिती पडल्यास तुम्हाला धक्का बसेल.   

3/9

झालं असं की, 1983 नंतर श्रीदेवीने दक्षिणेततून बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. श्रीदेवी तेव्हा हिम्मतवाला चित्रपटाची शूटिंग करत होती. तर संजय दत्तचा रॉकी चित्रपट प्रदर्शित झाला होता. आईचं निधन आणि व्यसनाचा बळी असा तो संजूचा काळ होता. 

4/9

त्यावेळी श्रीदेवी बॉलिवूडच्या चित्रपटात काम करण्यासाठी आली असून तिचं शूटिंग सुरु आहे. ही माहिती संजय दत्तला कळलं. त्याने कसलाही विचार न करता दारुच्या नशेत तो श्रीदेवीच्या भेटीला पोहोचला. श्रीदेवी मेकअप रुममध्ये आहे असं त्याला सांगण्यात आलं. तर तिने थेट मेकअपरुम गाठलं.   

5/9

संजय दत्तशी त्या अवस्थेत कोणालाही पंगा घ्यायचा नव्हता म्हणून कोणी त्याला अडवलं नाही. तो श्रीदेवीच्या मेकअपरुमजवळ पोहोचला आणि जोरजोरात दार ठोठावू लागला. श्रीदेवी घाबरली आणि तिने दरवाजा उघडण्यास नकार दिला. संजय दत्त अजून भडकला आणि त्याने जोरजोरात दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली.   

6/9

श्रीदेवी खूप घाबरली आणि तिने घाबरतच दरवाजा उघडला. त्यावेळी संजय दत्त रागात आणि दारुच्या नशेत तिला खूप काही बोलला. ही गोष्ट सेटवरील लोकांना कळली आणि नंतर त्यांनी हस्तक्षेप केला आणि संजय दत्तला मेकअपरुमच्या बाहेर काढलं. या घटनेनंतर श्रीदेवी इतकी घाबरली की संजूबाबासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर जेव्हा जेव्हा तिला संजय दत्तसोबत चित्रपटाचे ऑफर यायच्या ती नाही म्हणायची.   

7/9

त्यानंतर संजय दत्त व्यसनमुक्तीसाठी भारताबाहेर गेला. तिथून परतल्यानंतर त्याने साजनसारखे अनेक हिट चित्रपट गिले. पण श्रीदेवीच्या मनातून संजय दत्तची ती प्रतिमा जात नव्हती. 10 वर्षे उलटून गेली तरी त्याची भीती कायम होती. निर्मात्यांना 'खुदगवाह' चित्रपटात श्रीदेवीसोबत संजय दत्तला जोडायचं होतं पण त्यांना नागार्जुनला घ्यायव लागलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.  

8/9

श्रीदेवीला बॉलिवूडमध्ये आपला दम बसवायचा होता. अशात तिला यश जोहर निर्मित आणि महेश भट्ट दिग्दर्शित गुमराह या चित्रपटाची ऑफर आली. या चित्रपटात यश जोहरला अभिनेत्री म्हणून श्रीदेवी तर महेश भट्टला अभिनेता म्हणून संजय दत्त हवा होता. पण श्रीदेवी संजय दत्तसोबत काम करणार नाही हे माहिती होतं. पण यश जोहर आणि महेश भट्ट यांचा चित्रपट असल्याने श्रीदेवीने होकार दिला. पण मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर शूटिंगदरम्यान दोघ एकमेकांशी एक शब्द बोले नाहीत.   

9/9

हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचा फायदा श्रीदेवीला तिच्या करिअरसाठी झाला. या चित्रपटानंतर संजयला एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट मिळाले. पण श्रीदेवी बॉलिवूडपासून दूरच राहिली. 'कलंक' चित्रपटात माधुरीची भूमिका श्रीदेवी साकारणार होती.