PHOTO : नागा चैतन्यच्या आईचा दुसरा नवरा कोण? नागार्जुनपासून घटस्फोटानंतर 244 कोटींचा संपत्ती असलेल्या व्यावसायिकासोबत थाटला संसार

नागा चैतन्य याने दुसरं लग्न केलं. त्याचे वडील नागार्जुन आणि आई लक्ष्मी दग्गुबती यांनी घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं. नागा चैतन्यची आई लक्ष्मी यांनी सर्वात श्रीमंत व्यावसायिकाशी पुन्हा लग्न गाठ बांधली. 

| Dec 13, 2024, 18:24 PM IST
1/8

अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी दुसरं लग्न करून नागा चैतन्यने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये या जोडप्याने लग्न केलं. तर नागा चैतन्य हा नागार्जुन आणि डी. रामनायडू यांची मुलगी लक्ष्मी दग्गुबती यांचा मुलगा आहे. चैतन्य लहान असताना त्याच्या आई-वडील घटस्फोट घेतला होता. 

2/8

लक्ष्मी आणि नागार्जुन यांचा घटस्फोट झाल्यानंतर नागार्जुनने अभिनेत्री अमलाशी दुसरं लग्न केलं. नागा चैतन्यचा दुसऱ्या लग्नात संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं पण त्याची आई कुठेही दिसली नाही. नागा चैतन्यच्या आईनेही दुसरं लग्न केलंय. 

3/8

नागा चैतन्यच्या सावत्र वडिलांचं नाव शरत विजय राघवन आहे. नागार्जुन आणि लक्ष्मी वेगळे झाल्यानंतर दोघांनीही आपापले मार्ग निवडले. 1992 मध्ये नागार्जुनने अभिनेत्री अमालासोबत दुसरं लग्न केलं, तर लक्ष्मी दग्गुबतीने शरथ विजयराघवसोबत लग्न केलं. 

4/8

शरत विजय राघवन हे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह असून त्यांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शरथ विजय राघवन आणि लक्ष्मी यांना एक मुलगा देखील आहे. नागा चैतन्य याचे आपल्या सावत्र भावंडांशी चांगले संबंध आहेत. 

5/8

लक्ष्मी आणि शरत विजय राघवन लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाले असून लक्ष्मीने तिथे 'लक्ष्मी इंटिरिअर्स' नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 244.4 कोटी आहे. ते सध्या तीन कंपन्यांशी निगडीत आहे.

6/8

 नागा चैतन्यच्या पहिलं लग्न अभिनेत्री सामंथासोबत झालं होतं. दोघांनी 2017 मध्ये लग्न केले आणि 2021 मध्ये घटस्फोट घेतला. 2020 मध्ये, सामंथा आणि चैतन्य यांचा लक्ष्मी डग्गुबती आणि शरत विजय राघवन यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होते. समंथाचे तिच्या पूर्वीच्या सासरशी चांगले संबंध होते. घटस्फोटानंतरही समंथा राणा दग्गुबतीसोबत जवळीक कायम ठेवलीय, असं सांगितलं जातं. 

7/8

नागा चैतन्यने शोभिता धुलीपालाशी 4 डिसेंबर 2024 ला दुसरं लग्न केलं. यापूर्वी त्यांची एंगेजमेंट 8 ऑगस्ट 2024 रोजी झाली होती. लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये नागार्जुनची एक्स वाइफ लक्ष्मी अमलासोबत फॅमिली फोटो पाहिला मिळतो.

8/8

या फोटोमध्ये लक्ष्मी शोभिता आणि चैतन्यसोबत त्याची आई, शरथ विजयराघवनही त्यांच्यासोबत बसेल आहेत. तर सावत्र भाऊ आणि त्याची बायकोही या फोटोमध्ये आहे. याचा अर्थ नागा चैतन्यचा दुसऱ्या लग्नाला त्यांचा आक्षेप नाही. मात्र, त्याच्या आईची लग्नाला गैरहजेरी हा चर्चेचा विषय बनला आहे.