Who is Priya Saroj : कोण आहे प्रिया सरोज? क्रिकेटर रिंकू सिंगसोबत होतेय साखरपुड्याची चर्चा, तिची संपत्ती किती?

Rinku Singh Engagement : मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाची स्टार बॅट्समन रिंकू सिंगने खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा केल्याय अशी चर्चा रंगली आहे. कोण आहे प्रिया आणि तिची संपत्ती काय आहे पाहूयात. 

| Jan 17, 2025, 18:51 PM IST
1/8

उत्तर प्रदेशातील मच्छलीशहरमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रिया सरोज आणि रिंकू सिंग यांचं लग्न ठरल्याची चर्चा सुरु आहे. 

2/8

प्रिया सरोज 25 वर्षांची आहे. या तरुण खासदाराच्या रिंकू सिंगसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्या खूप चर्चिल्या जात आहेत. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचा दावा केला जात आहे.

3/8

या विजयामुळे त्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात निवडून आलेल्या दुसऱ्या सर्वात तरुण उमेदवार ठरल्या. तुफानी सरोज या समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत, या कनेक्शनमुळेच अखिलेश यादव यांनी प्रिया सरोज यांना तिकीट देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

4/8

समाजवादी पक्षाच्या खासदार असण्यासोबतच सुप्रीम कोर्टात वकील असून प्रॅक्टिसही करतात. प्रिया सरोज कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असायची. 

5/8

दिल्ली विद्यापीठातून बीए आणि नोएडा येथील एमिटी विद्यापीठातून एलएलबीची पदवी प्राप्त केली आहे.

6/8

प्रिया यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर प्रिया सरोज यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 11 लाख 25 हजार 719 रुपये होती.

7/8

सर्वात तरुण खासदाराने त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की त्यांच्या बॅक खात्यात एकूण 10 लाख 18,719 रुपये जमा झाले आहेत. प्रिया सरोज यांनी प्रतिज्ञापत्रात एकूण 32 हजार रुपये किमतीचे सोने असल्याची माहिती दिली होती.

8/8

प्रिया सरोज इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असून तिचे 2 लाख 40 हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.