'अटल सेतू'वर कोणत्या गाड्यांना बंदी, टोल किती? जाणून घ्या एका क्लिकवर सर्व प्रश्नांची उत्तरं

समुद्रात उभारण्यात आलेला देशातील सर्वात मोठा पूल अटल सेतूचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं आहे. या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर फ्कत 20 मिनिटात पार करता येणार आहे.   

Jan 12, 2024, 19:00 PM IST
1/10

1) पूल कुठून कुठपर्यंत असणार ?

1) पूल कुठून कुठपर्यंत असणार ?

हा पूल दक्षिण मुंबईच्या शिवडीपासून सुरु होईल आणि नवी मुंबईच्या न्हावा शेवापर्यंत जाईल. या पुलामुळे याआधी लागणारा 2 तासांचा वेळ 20 मिनिटांवर येईल.   

2/10

2) पूल कुठे-कुठे जोडला जाणार?

2) पूल कुठे-कुठे जोडला जाणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूल मुंबईला मुंबई-गोवा हायवे, वसई-विरार, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणार आहे. या पुलामुळे नवी मुंबईत अनेक नवे प्रकल्प सुरु होण्याची आशा आहे.   

3/10

3) पूल किती लांब असेल?

3) पूल किती लांब असेल?

हा सहा लेनचा पूल आहे. हा पूल 21.8 किलोमीटर लांब असून, त्याचा 16.5 किलोमीटर भाग समुद्र आणि 5.5 किलोमीटर जमिनीवर आहे. हा पूल समुद्राच्या तळापासून 15 मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे.   

4/10

4) पूल उभारणासाठी किती खर्च?

4) पूल उभारणासाठी किती खर्च?

या पुलाच्या बांधकामासाठी 17 हजार 840 कोटींचा खर्च आला आहे. अटल सेतू बनवण्यासाठी 1,77,903 मेट्रिक टन स्टील आणि 5,04,253 मेट्रिक टन सीमेंट वापरण्यात आलं. हा ब्रीज 100 वर्षं असाच उभा राहील असा दावा आहे.   

5/10

5) हा पूल खास का आहे?

5) हा पूल खास का आहे?

हा फक्त देशातील सर्वात लांब नाही, तर समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात मोठा पूल आहे. या पुलावर ऑटोमेटेड टोल कलेक्शन आणि इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टमही आहे. याशिवाय हा पूल बनवण्यासाठी मोठ्या ऑर्थॉट्रॉपिक स्टील डेकचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पूल उभारण्यासाठी जास्त खांबाची गरज भासली नाही. भारतात पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला आहे.   

6/10

6) कोणत्या वाहनांना परवानगी?

6) कोणत्या वाहनांना परवानगी?

या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकतात.   

7/10

7) कोणत्या वाहनांना बंदी?

7) कोणत्या वाहनांना बंदी?

मोटरबाईक, मोपेड, थ्री-व्हीलर टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर तसंच धीम्या गतीने जाणाऱ्या वाहनांना परवानगी नसणार आहे. बैलगाडीलाही परवानगी नाही.   

8/10

8) टोल किती?

8) टोल किती?

या पुलाचा वापर केल्यास एकावेळी 500 रुपयांचं इंधन वाचेल असा दावा आहे. पण पुलावरुन प्रवास करताना टोल भरावा लागणार आहे. जर तुम्ही एकाच बाजूचा टोल भरत असाल तर 250 रुपये भरावे लागतील. पण रिटर्नचाही काढला तर 375 रुपये होतील.   

9/10

9) महिन्याचा पास काढल्यास किती भरावे लागणार?

9) महिन्याचा पास काढल्यास किती भरावे लागणार?

रोज प्रवास करणाऱ्यांसाठी पासची सुविधाही आहे. कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी डेली पास 625 तर मंथली पास 12 हजार 500 रुपये असेल.   

10/10

10) वेगमर्यादा किती असेल?

10) वेगमर्यादा किती असेल? मुंबई पोलिसांनी वेगमर्यादा ताशी 100 किमी ठरवली आहे. पूल चढताना आणि उतरताना ही मर्यादा ताशी 40 किमी असेल.