भारतातील अनोखे स्टेशन जिथं वर्षातून फक्त 2 वेळाच जाते ट्रेन; इथं पासपोर्टशिवाय प्रवेश नाही
भारतीय रेल्वे किती लांबवर पसरली आहे हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी रेल्वनं दुरचा प्रवास केला आहे. पण तुम्हाला भारतातील सगळ्यात शेवटचं रेल्वे स्टेशन माहित आहे का? इतकंच नाही तर त्या रेल्वे स्टेशनचा इतिहास हा तितकाच वेगळा आहे.
1/7
2/7
भारतीय रेल्वेच्या या हटके रेल्वे स्टेशनचा किस्सा शहीद जवानांशी जोडलेला आहे. पंजाबच्या फिरोजपुर जिल्ह्यात असलेल्या या रेल्वे स्टेशनचं नाव देशाच्या इतिहासात देखील लिहिलेलं आहे. भारताचं हे अखेरचं रेल्वे स्टेशन असून त्या पुढे पाकिस्तानची सीमा सुरु होते. यालाच लाहोरचा गेटवे म्हटलं आहे. 1885 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा या रेल्वे स्टेशनवरून ट्रेन सुटली होती. पहिली ट्रेन फिरोजपुर ते कासौर (पाकिस्तान) या ठिकांनांपर्यंत गेली होती.
3/7
पाकिस्तानच्या सीमे जवळ असलेल्या या स्टेशनवर आता नियमितपणे ट्रेन जात नाही. फक्त वर्षातून दोनवेळा या स्टेशनवर ट्रेन जाते. त्याचं कारण म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शहीद जवानांसाठी इथून ट्रेन चालवण्यात येते. दरवर्षी नार्दन रेल्वेकडून शहीद दिवस (23 मार्च) आणि बैसाखी (13 एप्रिल) च्या निमित्तानं स्पेशनल डीएमयू ट्रेन चालवण्यात येते.
4/7
फिरोजपुर ते हुसैनीवाला बॉर्डरपर्यंत असलेली ही स्पेशल ट्रेन 10 किलोमीटरचा प्रवास करते. एक काळ होता जेव्हा ही ट्रेन पुढे लाहौरपर्यंत जायची. पण पाकिस्तानसोबत तनावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर या रेल्वे मार्गाला बंद करण्यात आलं. त्यानंतर आता फिरोजपुर ते हुसैनीवाला या अखेरच्या स्टॉपवर ट्रेन थांबते. रेल्वे ट्रॅकला ब्लॉक करण्यात आलं आहे. त्याशिवाय तिथे लिहिलं आहे की ' द एंड ऑफ नार्दर्न रेलवे'. हुसैनीवाला बॉर्डरवर शहीद भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरीची समाधी बनवण्यात आली आहे. तिथे दरवर्षी जत्रा भरते.
5/7
6/7
बांग्लादेशच्या सीमेजवळ भारताचं जे अखेरचं स्टेशन आहे त्याचं नाव सिंहाबाद आहे. खरंतर हे स्टेशन आता खाली असतं. या स्टेशनचा वापर हा फक्त मालगाड्यांच्या ट्रान्झिंटसाठी करण्यात येतो. हे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्याच्या हबीबपुर या परिसरात आहे. सिंहाबादवरून लोक काही किलोमीटर लांब असलेल्या बांग्लादेशमध्ये पायी जातात.
7/7