आधार-पासपोर्टच्या फोटोमध्ये लोक का हसत नाहीत? तुम्हाला माहितीये का खरं कारण

कोणत्याही गोष्टीसाठी फोटो काढण्याची एक वेगळी पद्धत असते. सगळ्याच फोटोसाठी तुम्ही हसायला हवं असं नाही. कारण आपण पाहतो ना की पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्टवर कधीच कोणाचे हसरे चेहरे फोटोत दिसत आहे. पण त्याची काही कारणं असतात. 

| Aug 04, 2024, 17:38 PM IST
1/7

तुमच्याकडे आधार कार्ड असेलच. अनेकांकडे पासपोर्ट देखील असेल. भारतात गेल्या काही दिवसांपासून आधार कार्डचं महत्त्व वाढलं आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का की तुमच्या या सगळ्या ओळखपत्रांसाठी फोटो काढत असताना तुमचा चेहरा इतका सीरियस का दिसतो. आधार कार्डसाठी फोटो क्लिक करत असताना लोक खूप गंभीर चेहरा करुन असतात. कोणाचाच हसरा चेहरा नसतो. काही एक्सपर्ट्सनं त्याचं खास सांगितलं आहे. 

2/7

खरंतर पासपोर्ट हा फक्त आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी महत्त्वाचा आहे. पण त्याशिवाय अनेक ठिकाणी आपण भारतीय आहोत हे दाखवण्यासाठी असलेली ओळखपत्र आहे. पण आधारकार्ड असो, पॅनकार्ड असो किंवा मग पासपोर्ट या सगळ्यांमध्ये हसताना फोटो नसण्याची अनेक कारणं आहेत. 

3/7

या सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे फेस रिकग्निशन सिस्टम आहे. हसताना चेहरा हा फेक वाटतो. त्यामुळे मशिनला चेहरा ओळखता येत नाही आहे. एक्सपर्ट्सचं स्पष्ट म्हणणं आहे की एक स्ट्रेट फेस हा डिटेक्ट करणं सोपं असतं. त्यामुळे ओळखही लपवता येत नाही. 

4/7

पासपोर्ट बाबतीत बऱ्याच देशांमध्ये एका समान नियम आहेत. त्यात हसण्याला बंदी आहे. त्याचं कारण म्हणजे प्रत्येकवेळी ती व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं हसली तर त्यामुळे चेहरा स्कॅन होणं हे कठीण होतं आणि मशिन ही गोंधळू शकते. 

5/7

त्याशिवाय जर चेहरा हा सीरियस असेल तर त्याला एडिट करणं कठीण होतं. त्याच्या विरोधात हसऱ्या चेहऱ्याला अगदी सहजपणे एडिट करता येतं. 

6/7

एका रिपोर्टनुसार, बायोमॅट्रिक फोटो काढताना देखील हेच नियम फॉलो करण्यात येतात. पासपोर्ट बायोमॅट्रिक फोटोमध्ये कोणीही कोणत्याही प्रकारे हावभाव देता येत नाही. हिच काळजी पासपोर्ट काढताना देखील घ्यावी लागते.   

7/7

एका सायबर एक्सपर्टनं सांगितलं होतं की जर हसण्याची मुभा दिली तर लोक कशीही स्माईल देतील. असे प्रयोग केले तर कागदपत्र कधीच तयार होऊ शकणार नाहीत.