Sunroof असणाऱ्या 5 स्वस्त SUV; कुटुंबही खूश आणि खिशालाही परवडणाऱ्या दमदार कार

गेल्या काही वर्षांपासून देशात सनरुफ कारची मागणी वाढत चालली आहे. प्रत्येकाला हे फिचर आपल्या कारमध्ये असावं असं वाटत आहे.   

May 09, 2024, 19:31 PM IST

गेल्या काही वर्षांपासून देशात सनरुफ कारची मागणी वाढत चालली आहे. प्रत्येकाला हे फिचर आपल्या कारमध्ये असावं असं वाटत आहे. 

 

1/8

गेल्या काही वर्षांपासून देशात सनरुफ कारची मागणी वाढत चालली आहे. प्रत्येकाला हे फिचर आपल्या कारमध्ये असावं असं वाटत आहे.   

2/8

हे फिचर आधी लक्झरी आणि प्रीमिअर कारमध्येच मिळत होतं. पण आता परवडणाऱ्या आणि कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार्समध्येही मिळत आहे.   

3/8

अशाच काही सनरुफ फिचर असणाऱ्या परडवणाऱ्या एसयुव्ही गाड्यांबद्दल जाणून घ्या...  

4/8

Maruti Brezza - 8.34 लाख

Maruti Brezza - 8.34 लाख

मारुतीने लाँच केलेली Brezza पहिली एसयुव्ही आहे ज्यामध्ये सनरुफ फिचर देण्यात आलं आहे. याच्या ZXi व्हेरियंटमध्ये सनरुफची सुविधा मिळते. ही एसयुव्ही CNG मध्येही उपलब्ध आहे.   

5/8

Tata Nexon - 8.14 लाख

Tata Nexon - 8.14 लाख

देशातील सर्वात सुरक्षित एसयुव्हीमधील एक नेक्सॉनच्या Smart + S व्हेरियंटमध्ये सनरुफचा पर्याय मिळतो. ही एसयुव्ही पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायात मिळते.   

6/8

Kia Sonet - 7.99 लाख

Kia Sonet - 7.99 लाख

किया सोनेट पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे. या एसयुव्हीच्या HTE (O) व्हेरियंटमध्ये सनरुफ मिळतो.   

7/8

Hyundai Venue - 7.94 लाख

Hyundai Venue - 7.94 लाख

हुंडाई वेन्यूला कनेक्टेड एसयुव्ही म्हणून बाजारात उतरवण्यात आलं आहे. याच्या S+ आणि S (O) व्हेरियंटमध्ये सनरुफची सुविधा मिळते. पेट्रोल-डिझेल अशा दोन्ही पर्यायात ही कार आहे.   

8/8

Mahindra XUV 3XO - 7.49 लाख

Mahindra XUV 3XO - 7.49 लाख

महिंद्रा एक्सयुव्ही 3XO ला नुकतंच लाँच करण्यात आलं. कंपनीने या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच पॅनारोमिक सनरुफ दिला आहे. याशिवाय यात लेव्हल 2 ADAS ही मिळतो.