'काही वेळासाठी मजा केली, पण मग'....', जेव्हा रेखा यांच्याशी जोडलं गेलं 'या' पाकिस्तानी दिग्गजाचं नाव
पडद्यावर रोमांचक भुमिका साकारणाऱ्या रेखा यांना खऱ्या आयुष्यातसूद्धा बऱ्याच चर्चांना सामोरे जावे लागले. त्यांचे नाव आत्तापर्यंत पाच-सहा जणांशी जोडले गेले आहे. मात्र एक नाव असे आहे ज्यावर विश्वासच नाही बसणार.
रेखा हे भारतीय सिनेसृष्टीतील एक फार प्रसिद्ध नाव आहे. त्यांना त्यांच्या सौंदर्यासाठी, अभिनयासाठी आणि खास करून नृत्यासाठी ओळखलं जाता. या ओळखीबरोबरच रेखा त्यांच्या लव्ह लाईफसाठीसूद्धा कायम चर्चेत असतात.
1/6
रेखा कायमच चर्चेत

2/6
रेखा आणि मुकेश

3/6
पाकिस्तानचे माजी कर्णधार

रेखा फक्त भारतातच नाही तर, पाकिस्तानातही नावाजलेल्या आहेत. त्यांचे चाहते सीमेपलीकडेही आहेत. रेखा यांचे नाव एका अशा व्यक्तीशी जोडले गेले होते, ज्यावर विश्वासच बसणार नाही. हे नाव आहे पाकिस्तानला 1992 चे विश्वचषक जिंकवून देणारे, माजी कर्णधार 'इम्रान खान'. या पाकिस्तानी क्रिकेटपटूशी रेखा यांचे प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या फार चर्चेत होत्या. दोघांची छायाचित्रेदेखील वर्तमानपत्रात छापली गेली होती. दोघे नाईट क्लबच्याबाहेर, समुद्रकिनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र फिरताना दिसायचे.
4/6
वर्तमानपत्रातील लेख

1985 साली 'द स्टार' नामक वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका लेखानुसार, रेखा यांच्या आईची या नात्याला पुर्ण अनुमती होती. अगदी त्यांनी ज्योतिषालासूद्धा रेखा आणि इम्रान यांच्या नात्याचे भविष्य विचारले होते. मात्र दोघांनीही कधीच त्यांचे नाते उघडपणे स्वीकारले नाही. रेखा यांनी कधीच या नात्याविषयी काही सांगितले नाही. इम्रान खान यांनी मात्र काहीतरी चालू असल्याचे संकेत दिले होते.
5/6
इम्रान खान यांचे वक्तव्य

6/6
नंतर केली तीन लग्ने
