"हे नारायण मूर्ती बस कंडक्टर आहेत का?", लग्नाआधी सुधा मुर्तींना पडला होता प्रश्न; पाहताच म्हणाल्या "हा छोटा मुलगा..."

Sudha Murty on Narayan Murty: भारतातील टॉप आयटी कंपनी इंफोसिसचे (Infosys) संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी नुकतीच 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma)शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात सुधा मुर्ती यांन इंफोसिसच्या स्थापनेपासून ते लग्नापर्यंतचे अनेक किस्से सांगितले.   

May 16, 2023, 18:55 PM IST

Sudha Murty on Narayan Murty: भारतातील टॉप आयटी कंपनी इंफोसिसचे (Infosys) संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी नुकतीच 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma)शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात सुधा मुर्ती यांन इंफोसिसच्या स्थापनेपासून ते लग्नापर्यंतचे अनेक किस्से सांगितले. 

 

1/9

भारतातील टॉप आयटी कंपनी इंफोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी नुकतीच 'द कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावली.   

2/9

या कार्यक्रमात सुधा मुर्ती यांन इंफोसिसच्या स्थापनेपासून ते लग्नापर्यंतचे अनेक किस्से सांगितले.   

3/9

सुधा मूर्ती यांनी यावेळी एन आर नारायण मूर्ती यांच्यासोबतचा लग्नाचा एक किस्सा सांगितला. त्यावेळी सुधा मूर्ती यांना नारायण मूर्ती बसचे कंडक्टर आहेत असं वाटलं होतं.   

4/9

सुधा मूर्ती यांनी सांगितलं की, नारायण मूर्ती यांचे प्रसन्ना नावाचे मित्र माझ्यासह पुण्यात काम करत होते. आम्ही बसमधून ऑफिसला जायचो. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे नारायण मूर्ती यांचा उल्लेख केला होता.   

5/9

सुधा मूर्ती यांनी सांगितलं की, ते रोज एक नवं पुस्तक घ्यायचे. कधी नारायण मूर्ती पेशावर, कधी इस्तंबूल. यामुळे मला नारायण मूर्ती आंतरराष्ट्रीय बस कंडक्टर आहेत का? असं वाटलं होतं.   

6/9

त्यानंतर सुधा मूर्ती यांनी मित्राला नारायण मूर्ती नेमके कोण आहेत अशी विचारणा केली. त्यावर त्याने नारायण मूर्ती माझे मित्र असून सध्या ते पॅरिसमध्ये राहतात आणि आता ते भारतात आले आहेत असं सांगितलं.   

7/9

प्रसन्ना यांनी सुधा मूर्तींना नारायण मूर्ती तुम्हाला भेटण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं. यानंतर सुधा मूर्ती यांना नारायण मूर्ती एकदम डॅशिंग, हँडसम कोणीतरी असेल असं वाटलं होतं. पण दरवाजा उघडल्यावर पाहिलं असता त्यांनी हा कोण माणूस आहे, छोटा मुलगा असं विचारलं होतं.   

8/9

सुधा मूर्ती यांनी यावेळी 1981 मध्ये इंफोसिसच्या स्थापनेवेळी पती नारायण मूर्ती यांना उधार म्हणून दिलेल्या 10 हजार रुपयांबद्दलही सांगितलं.   

9/9

नारायण मूर्ती यांना त्यावेळी आपल्या मित्रांसह एक सॉफ्टवेअर कंपनी सुरु करायची होती. यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यावेळी मी त्यांना वाचवलेल्या पैशातून 10 हजार रुपये दिले होते.