जेव्हा रितेश देशमुख म्हणाला- 'माझं आणि जिनीलियाचं नातं मोडलं!' नेमकं काय घडलं?

Riteish Deshmukh and Genelia: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा हे बॉलिवूडचं आयडियल कपल आहे. या जोडीवर त्यांचे चाहते खूप प्रेम करतात. पण आयडियल कपल असणाऱ्या रितेश आणि जिनिलिया लग्नापूर्वी एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते. परंतु एकदा रितेशने जिनिलियाला आपलं नातं मोडलं असा मेसेज पाठवला होता. हा किस्सा स्वतः जिनिलियाने कपिल शर्मा शो सह तिच्या काही मुलाखतींमध्ये सांगितला आहे. 

Pooja Pawar | Oct 04, 2024, 15:02 PM IST
1/6

जिनिलिया आणि रितेश देशमुख यांचं लग्न 3 फेब्रुवारी 2012 मध्ये झालं होतं. जिनिलिया ही ख्रिश्चन तर रितेश हा हिंदू असल्याने त्या दोघांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करून मराठी आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. 

2/6

तुझे मेरी कसम हा रितेश आणि जिनिलियाचा पहिला चित्रपट होता. दोघांनी 2003 राजी या चित्रपटातूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात झालं. रिलेशनशिपमध्ये असताना एकदा रितेशने जिनिलियाला रात्री ब्रेकअपचा मेसेज पाठवला होता. हा किस्सा स्वतः रितेश आणि जिनिलियाने सांगितला आहे.

3/6

 कपिल शर्मा शोवर एकदा जिनिलिया आणि रितेश आले होते. तेव्हा कपिलने जिनिलियाला विचारलं की रितेशने कधी तुझ्या सोबत प्रॅन्क केला आहे का? तेव्हा जिनिलियाने सांगितले की, 'आम्ही एकमेकांना डेट करत असताना एकदा एप्रिल फुलचा दिवस होता. तेव्हा रितेशने मला मेसेज पाठवला की आपलं नातं मोडलं. आणि तो झोपायला गेला. रितेश खूप उशिरा झोपायचा आणि मी खूप लवकर झोपून जायचे. त्याने रात्री 1 च्या सुमारास मला हा मेसेज पाठवला आणि झोपी गेला. मी रात्री अडीचच्या सुमारास तो मेसेज वाचला आणि खूप डिप्रेस झाले होते'.    

4/6

जिनिलिया पुढे म्हणाली की, 'मी सकाळी 9 वाजेपर्यंत नाराज होते आणि डिप्रेस होते. तो सकाळी उठला आणि त्याला लक्षात राहील नाही की त्याने काय केलं. रितेशने सकाळी मला फोन केला आणि विचारलं काय करतेस. तेव्हा मी त्याला म्हंटले की मला वाटत नाही की आपण बोलायला हवं. मला तुझ्याशी बोलायच नाहीये'.   

5/6

रितेशने जिनिलियाला विचारलं की काय झालं? तेव्हा ती म्हणाली तू तर असा बोलतोस जस काही झालंच नाही. तेव्हा जिनिलियाने रितेशला आठवण करून दिली की त्याने तिला रात्री ब्रेकअपचा मेसेज केला आहे. तेव्हा रितेशला आठवलं आणि त्याने जिनिलियाला हा एप्रिल फुलचा प्रॅन्क होता असं सांगितलं. जिनिलिया रितेशला म्हणाली, याबाबत तू प्रॅन्क कसा करू शकतोस? तेव्हा रितेशने तिला सॉरी म्हंटल आणि हे प्रकरण तिथेच मिटलं. 

6/6

रितेश आणि जिनिलिया यांच्या लग्नाला आता 12 वर्ष पूर्ण झाली असून दोघांना रियान आणि राहील अशी दोन गोंडस मुलं आहेत. रितेश आणि जिनिलिया तब्बल 12 वर्षांनी 'वेड' या मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आले होते. रितेशनेच दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुपरहिट झाला होता.