जेव्हा इंदिरा गांधी दिला होता शेख हसीना यांना आश्रय; एका रात्रीत उद्ध्वस्त झालं सर्वात शक्तीशाली कुटुंब

Sheikh Hasina Family : ती काळरात्र, बांगलादेशची राजधानी ढाकामधील धानमंडी परिसरातील रस्ता क्रमांक 32 मधील घर क्रमांक 677 मध्ये 15 ऑगस्ट 1975 ला हत्याकांड घडलं. त्यानंतर शेख हसीना यांच्या आयुष्य बदललं. त्या आणि त्यांची बहीण शेख रेहाना जर्मनीमध्ये असल्याने...  

नेहा चौधरी | Aug 05, 2024, 17:33 PM IST
1/11

शेख हसीना या पुन्हा एकदा भारतात आश्रयसाठी आल्या आहेत. हो, जेव्हा 1975 मध्ये शेख हसीना यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मारून टाकलं होतं. त्यावेळी संपूर्ण कुटुंब गमावल्यानंतर शेख हसीना यांना तेव्हा भारताने आश्रय दिला होता. 

2/11

बांगलादेशचे संस्थापक आणि देशाचे पहिले राष्ट्रपती 'बंगबंधू' शेख मुजीबुर रहमान यांची त्यांच्या कुटुंबासह हत्या करण्यात आली. शेख मुजीब-उर-रहमानला विश्वास नव्हता की आपलेच लोक आपल्याविरुद्ध बंड करू शकतात. धक्कादायक म्हणजे भारतीय गुप्तचर एजन्सी रॉने त्यांना इशाराही दिला होता. तरीदेखील त्यांनी त्यावर विश्वास ठेवला नव्हता. 

3/11

शेख मुजीब-उर-रेहमान यांना त्यावेळी त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर किती धोका आहे हे समजू शकले नाही. ऑगस्ट 1975 मध्ये बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल शफीउल्ला यांना अशी माहिती मिळाली की लष्कराच्या दोन बटालियन कोणत्याही आदेशाशिवाय शेख मुजीबच्या घराकडे जात आहेत. त्याने शेख मुजीब यांना फोन केला, पण लाइन व्यस्त होती. अनेक प्रयत्नांनंतर ते शेख मुजीब यांच्या संपर्कात झाला. 

4/11

पहाट झाली नव्हती, दूर मशिदीतून आजानचा आवाज येत होता अन् अचानक धनमंडी परिसरातून शेख मुजीबच्या घराभोवती गोळीबाराचा आवाज येऊ लागला. या गोळीबारात शेख मुजीबसह कुटुंबातील 17 जणांचा मृत्यू झाला. 

5/11

पण यात हत्याकांडात कुटुंबातील दोन बहिणी जीवंत राहिल्यात, एक शेख हसीना आणि दुसरी शेख रेहाना. कारण त्यावेळी त्या जर्मनीत होत्या. त्या वेळी या दोघी बहिणी घरात असत्या तर कदाचित त्यांनाही बंडखोर अधिकाऱ्यांनी त्यांना मारलं असतं.

6/11

हे संपूर्ण हत्याकांड घडवून आणणाऱ्या कर्नल फारुख रहमान आणि मेजर हुदा यांच्यासह पाच नराधमांना 2010 मध्ये ढाक्याच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. तर हत्येमध्ये सहभागी असलेल्या अब्दुल मजीदला 2020 मध्ये कोरोनाच्या काळात फाशी देण्यात आली होती.  

7/11

लष्करी उठावात शेख मुजीब मारले गेल्याचं राजदूत सनाऊल हक यांना कळताच त्यांनी या दोन मुली आणि जावयांना कोणतीही मदत देण्यास नकार दिला. एवढंच नव्हे तर त्यांना त्यांचं घर सोडून जाण्यासही सांगितलं.

8/11

जर्मनीतील बांगलादेशचे राजदूत हुमायून रशीद चौधरी यांच्या मदतीने शेख हसीना, शेख रेहाना आणि जावय कसेतरी जर्मनीला पोहोचले. त्यानंतर अर्ध्या तासातच युगोस्लाव्हियाच्या दौऱ्यावर असलेले बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. कमल हुसैनदेखील तिथे पोहोचले.

9/11

आता पुढे काय अशात भारतात आश्रयसाठी जायचं असं ठरलं, पण यासाठी बराच वेळ लागेल असं त्यांना समजलं. त्यात भारतात त्यावेळी आणीबाणी लागू करण्यात आली होती. इंदिरा गांधीही अनेक समस्यांमधून जात होत्या. 

10/11

क्षणाचाही विलंब न करता जर्मनीतील बांगलादेशचे राजदूत हुमायून रशीद चौधरी यांनी डी. पी. धर आणि हक्सर यांना फोन केला पण ते भारताबाहेर होते. मग काही पर्याय नसल्याने त्यांनी इंदिरा गांधींच्या कार्यालयात थेट फोन लावला. पण हा फोन स्वत: इंदिरा गांधी यांनी उचलला.

11/11

त्यावेळी इंदिरा गांधींनी सर्व परिस्थिती जाणून घेतली आणि बंगबंधूंच्या मुलींना राजकीय आश्रय देण्याचं त्यांनी ताबडतोब मान्य केलं. 24 ऑगस्ट 1975 ला एअर इंडियाच्या विमानाने शेख हसीना आणि त्यांचं कुटुंब दिल्लीतील पालम विमानतळावर आल्यात. मंत्रिमंडळातील एका सहसचिवांनी त्यांचं स्वागतही केलं. त्यानंतर त्यांना 'रॉ'च्या 56, रिंग रोडमधील सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. नंतर त्यांना डिफेन्स कॉलनीतील घरात हलवण्यात आलं.