पुढील कुंभमेळा कधी आणि कुठे होणार?

| Oct 17, 2024, 23:05 PM IST
1/7

पुढील कुंभमेळा कधी आणि कुठे होणार?

2/7

हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.   

3/7

पुढील कुंभमेळा 2025 मध्ये प्रयागराज (अलाहाबाद) येथे आयोजित केला जाईल ज्याला महा कुंभमेळा असं म्हंटल जाणार आहे. या सणाला पूर्ण कुंभ असेही म्हणतात. प्रयागराज आणि हरिद्वारमध्ये दर 6 वर्षांनी अर्धकुंभ आयोजित केला जातो.

4/7

कुंभमेळा हा एक हिंदू सण आहे, ज्यामध्ये एकाच ठिकाणी मानवतेचा मेळावा बघायला मिळतो. 2019 मध्ये, प्रयागराजमधील अर्ध कुंभमेळ्याने जगभरातून 150 दशलक्ष पर्यटक आले होते. ही संख्या 100 देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. 

5/7

कुंभमेळ्यामागील आख्यायिका अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून अमृताचा कलश निघाला. जो अमृत प्याला तो अमर झाला. त्यामुळे या अमृताच्या भांड्यासाठी देव आणि असुर एकमेकांशी लढले.  

6/7

जेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला तेव्हा त्यांनी अमृत कलश धारण केला. हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक, उज्जैन येथे काही थेंब पडले. शेवटी ही दंतकथा साजरी करण्यासाठी या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.

7/7

कुंभमेळ्याच्या वेळी आणखी एक खगोलीय घटना घडते आणि ही वेळ आहे जेव्हा गुरु कुंभ राशीत किंवा कुंभ राशीत असतो आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करतो.