आयपीएलआधी मोठा निर्णय, मुंबई 'या' चार तर दिल्ली तीन खेळाडूंना करणार रिटेन... हार्दिकचं कर्णधारपद जाणार?

IPL 2025 : आयपीएल 2025 साठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएमधल्या दहा फ्रँचाईजींना त्यांच्या रिटेन खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सीलकडे सोपवायची आहे. त्याआधी आयपीएलमधल्या तीन संघांनी मोठी निर्णय घेतला आहे.

| Oct 17, 2024, 20:00 PM IST
1/7

आयपीएलआधी मोठा निर्णय, मुंबई 'या' चार तर दिल्ली तीन खेळाडूंना करणार रिटेन... हार्दिकचं कर्णधारपद जाणार?

2/7

आयपीएल 2025 आधी कोणता संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आहे याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स चार, दिल्ली कॅपिटल्स आणि सनराजर्स हैदराबाद प्रत्येकी तीन खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे. 

3/7

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 आधी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने चार महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार हार्दिक पांड्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना मुंबई संघात कायम ठेवणार आहे. 

4/7

आययपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईची कामगिरी अतिशय खराब झाली होती. त्यामुळे नव्या हंगामात हार्दिकची कर्णधारपदावरुन उचलबांगडी होणार असल्याचीही चर्चा रंगली होती. पण मुंबईचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडेच राहाणार आहे. 

5/7

तर हिटमॅन रोहित शर्माही मुंबईच्याच संघातून खेळणार असल्याचं मुंबई इंडियन्सने स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा आयपीएलमध्ये इतर संघांतून खेळण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण मुंबई फ्रँचाईजीने या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. 

6/7

दिल्ली कॅपिटल्सनेही रिटेन खेळाडूंची नावं निश्चित केली आहेत. रिपोर्टनुसार ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवला संघात कायम ठेवणार आहे. तर संघातील सर्व विदेशी खेळाडूंना ऑक्शनसाठी मोकळं केलं जाणार आहे. 

7/7

हैदराबाद फ्रँचाईजीने आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्सला संघात कायम ठेवण्याबरोबरच कर्णधारपदही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय गेल्या हंगामात तुफान कामगिरी करणारे हेन्रिक क्लासेन आणि अभिषेक शर्मालाही रिटेन केलं जालं आहे.